alleged SOPO collection scam : महानगरपालिकेच्या मार्केट परिसरात साहित्य विक्री करणाऱ्यांकडून विना पावती सोपो कर आकारणी प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीररित्या कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त क्लेन मेदेरा यांनी दिली. तसेच हा घोटाळा किमान दहा ते पंधरा वर्षांपूर्वीचा असल्याचे दिसून येते आहे असेही सांगितले.
महानगरपालिकेच्या मार्केट इमारतीबाहेर आणि मासळी मार्केटच्या अवतीभोवती रस्त्याच्या बाजूला वस्तू विक्रीसाठी बसणाऱ्या विक्रेत्यांकडून विना पावती सोपो कर आकारल्याचा प्रकार नगरसेवक उदय मडकईकर यांनी उघडकीस आणला होता.
यानंतर या प्रकाराची दखल घेत महापालिकेने तत्काळ पावती मशीन खरेदी केली. तसेच आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी न केल्यास घडलेल्या प्रकाराविरोधात पोलिस तक्रार करणार असल्याची माहिती मडकईकर यांनी दिली होती.
दरम्यान या प्रकाराची दखल घेत आयुक्तांनी दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीररित्या कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी एका कर्मचाऱ्यास निलंबीत करण्यात आले आहे तर सुपरवायझरला कारणे दाखवा नोटस बजावण्यात आली आहे.
विना पावती सोपो कर वसुली किती वर्षांपासून सुरू आहे तसेच वसुल केलेला निधी महापालिकेच्या तिजोरीत येत होता का याची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.