आता गोव्यातही मिळणार रात्री 8 नंतर सार्वजनिक बससेवा; मुख्यमंत्री सावंतांनी सांगितला सरकारचा प्लॅन

कदंबच्या ताफ्यात 20 नव्या AC इलेक्ट्रिक बस दाखल
Cm Pramod sawant
Cm Pramod sawantDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात, आम्हाला रात्री 8 नंतर चालणारी कोणतीही बस आढळत नाही. जरी आमचे काही नुकसान झाले तरी आम्ही ते सहन करू पण आता गोव्यातील प्रमुख बसस्थानकांवर रात्री उशिरा बससेवा सुरू करण्याची वेळ आली आहे असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

बांबोळी येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नव्या बसेसचे उद्घाटन करता त्यांना हिरवा झेंडा दाखवला. यावेळी यावेळी परिवहन मंत्री माविन गुदिन्हो, केटीसीएल अध्यक्ष उल्हास तुयेकर, पणजी महापौर रोहित मोन्सेरात, KTCL चे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Cm Pramod sawant
आता तुम्ही सांभाळा! स्मार्ट सिटीच्या विळख्यातून पणजीला वाचवण्यासाठी संजीत रॉड्रिग्स यांना पाचारण

राज्यातील नागरिकांनी खाजगी वाहनांचा वापर न करता सार्वजनिक वाहतूकीचा वापर करावा. औद्योगिक वसाहतींना लिंक करण्यासाठी तसेच रात्री 8 नंतर चालणारी कोणतीही बस आढळत नाही. जरी आमचे काही नुकसान झाले तरी आम्ही ते सहन करू पण आता गोव्यातील प्रमुख बसस्थानकांवर रात्री उशिरा बससेवा सुरू करण्याची वेळ आली आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पर्यटक किंवा गोव्यातील नागरीकांना रात्री 8 नंतर प्रवास करण्यासाठी पणजी ते म्हापसा, फोंडा, कुडचडे, शिरोडा या मार्गांवर बससेवा सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे. गोवा मॉडेल राज्य बनवत असताना ट्रान्सपोर्ट सिस्टिम कुठेही कमी पडायला नको. कदंबा आणि खासगी बस मालकांनी मिळून लोकांना चांगली सुविधा देण्याचे सरकारचे स्वप्न पूर्ण करुया असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

वास्को, मडगाव, पणजी आणि म्हापसा ही बसस्थानके आधुनिक केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी दिली. तसेच, खासगी बस लवकरच कदंब महामंडळात समावेश करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती सावंत यांनी दिली. लवकरच गोव्यात देखील आठ नंतर सार्वजनिक बस वाहतूक उपलब्ध होणार असल्याची माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Surla Farmers Compensation
Goa Olympians Development
Goa CM Pramod Sawant accident help
Goa ST Political Reservation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com