Drug Trafficking Dainik Gomantak
गोवा

Drug Trafficking: हैदराबाद-गोवा ड्रग्ज कनेक्शन उघड! फरार आरोपीला गोव्यातून अटक; 48.4 लाखांच्या व्यवहारांची चौकशी

Hyderabad Goa Drug Trafficking Connection: हैदराबादमधील अमली पदार्थ तस्करी प्रकरणात फरार असलेला कस्टोडिओ फर्नांडिस ऊर्फ क्रिस्टी याला तेलंगणातील ईगल फोर्सने गोव्यातून अटक केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: हैदराबादमधील अमली पदार्थ तस्करी प्रकरणात फरार असलेला कस्टोडिओ फर्नांडिस ऊर्फ क्रिस्टी याला तेलंगणातील ईगल फोर्सने गोव्यातून अटक केली. हैदराबाद शहर पोलिस आणि पंजागुट्टा पोलिसांच्या समन्वयातून ही कारवाई करण्यात आली. हैदराबाद पोलिसांनी त्यांच्या अधिकृत समाजमाध्यम खात्यावरून ही माहिती दिली.

या प्रकरणात ४८.४ लाख रुपयांच्या बँक व्यवहारांची तपासणी सुरू आहे. तेलंगणातील २५ हून अधिक रहिवाशांचा ऑनलाइन अमली पदार्थ खरेदी-विक्रीच्या कथित जाळ्याशी संबंध आहे का, याचीही पडताळणी केली जात आहे. तपास यंत्रणांच्या संशयानुसार, फर्नांडिसशी संबंधित व्यक्ती हैदराबादमधील ग्राहकांना अमली पदार्थ पुरवत असत.

त्यांच्याकडून रोख रक्कम गोळा करून ती एटीएमद्वारे फर्नांडिसशी संबंधित बँक खात्यांत जमा केली जात असल्याचा संशय आहे. गोवा, बंगळूर, मुंबई, नवी दिल्ली आणि अन्य ठिकाणांहून कार्यरत असल्याचा संशय असलेल्या आंतरराज्यीय अमली पदार्थ पुरवठादारांचाही तपास सुरू आहे.

रक्कम एटीएमद्वारे खात्यांत होतेय जमा

हैदराबादमधील ऑनलाइन अमलीपदार्थ खरेदी-विक्रीच्या कथित जाळ्याशी तेलंगणातील २५ हून अधिक रहिवाशांचा संबंध आहे का, याची तपास यंत्रणा पडताळणी करत आहे. अमलीपदार्थांच्या विक्रीतून मिळालेली रक्कम एटीएमद्वारे आरोपीशी संबंधित खात्यांत जमा केली जात असल्याचा संशय आहे. गोवा, बंगळूर, मुंबई, नवी दिल्लीसह विविध ठिकाणांहून कार्यरत असल्याचा संशय असलेल्या पुरवठादारांचाही तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India GDP Growth: सुपरपॉवर इंडिया! जागतिक मंदीच्या काळात भारताची अर्थव्यवस्था सुस्साट; IMF ने वाढवला देशाचा ग्रोथ रेट

Goa Politics: 'लोबोंमुळे भाजप सोडण्याची वेळ आली'! रोशन रेडकरांचा राजीनामा; 'बर्च'प्रकरणी खुल्या चर्चेचे आव्हान

Luthra Brothers Bail: लुथरा बंधूंना अखेर जामीन; पण कोर्टाच्या 6 कठोर अटी! पासपोर्ट जमा करण्याचेही आदेश

BJP Mahila Morcha: महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून भाजप आक्रमक! बिमोल अकोईजम यांच्या राजीनाम्यासाठी पणजीत महिला मोर्चाचे आंदोलन

खरी कुजबुज: बुद्धी तल्लख, पण नैतिकता नापास!

SCROLL FOR NEXT