Hut burns at Karapur Dainik Gomantak
गोवा

कारापूर येथे झोपडी जळाली...

विहिरीत पडलेल्या गायीला मिळाले जीवदान

दैनिक गोमन्तक

डिचोली: कारापूर-साखळी येथील एका झोपडीला आग लागून ती भस्मसात होण्याची घटना घडली. अन्य एका घटनेत मये येथे विहिरीत पडलेल्या गायीला जीवदान देण्‍यात आले.

कारापूर तनुजा नाईक या महिलेच्या झोपडीला अचानक आग लागली. आगीत पूर्ण झोपडी जळून खाक झाली. या दुर्घटनेत 20 हजारांहून अधिक रुपयांची हानी झाली. झोपडीला आग कशी लागली, त्याचे कारण समजू शकले नाही. डिचोली अग्निशामक दलाला घटनेची माहिती मिळताच दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लिडींग फायर फायटर साईनाथ केसरकर यांच्या नेतृत्वाखाली दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. यू. पी. मांद्रेकर, व्ही. एम. गाड (चालक ऑपरेटर), एस. एल. नाईक, आर. आर. मातोंडकर, आर. एम. एकावडे, आशिष मोर्लेकर, सूरज कुंकळयेकर, एस. व्ही. उसपकर आणि एच. एच. सावंत या जवानांनी मदतकार्यात भाग घेतला.

विहिरीत पडलेल्या गायीला जीवदान

डिचोली अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे विहिरीत पडलेल्या एका गायीला जीवदान मिळाले. केळबायवाडा-मये येथे विहिरीत गाय पडल्याची घटना आज सकाळी निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळाल्‍यावर दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन गायीला सुखरूप विहिरीबाहेर काढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT