husband Venkat Raman of Bengaluru CEO Suchna Seth  Dainik Gomantak
गोवा

कोणते नवीन खुलासे होणार? खुनातील संशयित सूचनाचा पती कळंगुट पोलीस स्थानकात हजर

काही दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याला चौकशीसाठी समन्स बजावले होते.

Pramod Yadav

चार वर्षीय मुलाच्या खून प्रकरणात अटकेत असलेल्या संशयित सूचना सेठचा पती गोव्यात दाखल झाला आहे. पती व्यंकटरमण शनिवारी (दि.13) आपल्या वकिलासोबत कळंगुट पोलीस स्थानकात हजर झाला. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याला चौकशीसाठी समन्स बजावले होते.

सूचना सेठचा पती गोव्यात दाखल झाल्यानंतर आता या खूनप्रकरणात कोणते नवीन खुलासे समोर येणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. व्यंकटरमण दुपारी कळंगुट पोलीस स्थानकात हजर झाल्यानंतर त्याने प्रसार माध्यमांसोबत संवाद साधण्यास नकार दिला.

सूचनाने यापूर्वी चौकशीत पतीसोबत तणापूर्व संबंध असल्याचा खुलासा केला होता. दोघांमधील घटस्फोटाची प्रक्रिया सुरु आहे तसेच, मुलाच्या कस्टडीबाबत देखील वाद असल्याचे तपासातून समोर आले होते. त्या अनुषंगाने पतीची चौकशी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शुक्रवारी कळंगुट पोलिसांनी सूचना सेठला घटनास्थळी घेऊन जात क्राईम सीन रिक्रिएट केला. सूचनाने यावेळी त्या दोन दिवसांत घडलेल्या घटनांचा घटनाक्रम सांगितला. कात्रीच्या मदतीने तिने हाताची नस देखील कापल्याचे कबुल केले. मात्र, सूचनाने मुलाचा खून केला नसल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

Viral Video: किंग कोब्राला चक्क किस करण्याचा प्रयत्न; पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून लोकांची धाकधूक वाढली, पाहा व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT