ED ची चौकशी त्याच दिवशी गोवा दौरा; अरविंद केजरीवाल घाबरत असल्याचा भाजपचा आरोप

ईडीने केजरीवाल यांना 18 जानेवारीला चौकशीसाठी बोलावले आहे.
Arvind Kejriwal Goa Visit
Arvind Kejriwal Goa VisitDainik Gomantak

Arvind Kejriwal Goa Visit: कथित दारू घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौथे समन्स बजावण्यात आले आहे. या समन्समध्ये ईडीने केजरीवाल यांना 18 जानेवारीला चौकशीसाठी बोलावले आहे.

विशेष म्हणजे सीएम अरविंद केजरीवाल 18 तारखेलाच गोवा दौऱ्यासाठी रवाना होणार असून 20 जानेवारीपर्यंत ते तिथेच राहणार आहेत. याआधीही केजरीवाल यांनी ईडीच्या तीन समन्सना राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगून त्याकडे दुर्लक्ष केले होते.

ईडीच्या चौथ्या समन्सनंतर भाजपने अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षावर निशाणा साधला आहे. 'मला माहितेय, त्यांनी चोरी केली आहे आणि चौकशीला दांडी मारायची आहे, म्हणून ते गोव्याला जात आहेत. केजरीवाल नेहमीच तपासातून पळून जाण्याचा मार्ग शोधतात,' असे दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी म्हटले आहे.

Arvind Kejriwal Goa Visit
एक दिवस वाढला, केजरीवाल यांचा गोवा दौरा आता तीन दिवसांचा; नवी तारीख आली समोर

'चौथा समन्स येताच ते या काळात मी गोवा दौऱ्यावर आहे. म्हणजे तुम्ही राजकीय पर्यटन कराल आणि चोरी केली म्हणून चौकशीपासून पळ काढाल. तुम्ही उत्तर द्यायला घाबरता,' असा शब्दात सचदेवा यांनी टीका केली.

'तुम्ही मुख्यमंत्री आहात. तुम्ही कायद्याचे पालन करू अशी राज्यघटनेची शपथ घेतली आहे. तपास यंत्रणा तुम्हाला समन्स पाठवत आहे. तुम्ही प्रामाणिक असाल तर जाऊन बोला, पुरावे सादर करा. मात्र तुम्ही चोरी केल्याचेही तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही तपास टाळत आहात,' असे वीरेंद्र सचदेवा म्हणाले.

यावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली असून, पूर्वी केजरीवाल भ्रष्टाचाराविरोधात बोलायचे, पण आज ते स्वत: त्यात गुंतले आहेत, असा आरोप त्यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com