Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Fatorda Murder Case: घरगुती वाद शिगेला पोहोचला, सुतार पतीने पत्नीचा काटा काढला; फातोर्डात खून

Goa Crime News: बुधवारी रात्री दोघांमधील वाद शिगेला पोहोचला. यातच राग अनावर झालेल्या पतीने पत्नीला गंभीर मारहाण केली व तिचा खून केला.

Pramod Yadav

मडगाव: घरगुती वादातून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना फातोर्डा येथून समोर आली आहे. मूळ पश्चिम बंगाल येथील असलेले हे दाम्पत्य मुंगुल - फातोर्डा येथे वास्तव्यास होते. पोलिसांनी संशयित पतीला अटक केली आहे. बुधवारी (३० एप्रिल) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

करिष्मा रॉय (२८) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, कृष्णा रॉय असे संशयित पतीचे नाव आहे. फातोर्डा पोलिसांनी संशयित कृष्णाला अटक केली आहे. कृष्णा सुतारकाम करतो. पती - पत्नीमध्ये विविध कारणांवरुन वारंवार खटके उडायचे. बुधवारी रात्री दोघांमधील वाद शिगेला पोहोचला. यातच राग अनावर झालेल्या पतीने पत्नीला गंभीर मारहाण केली व तिचा खून केला.

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टीकमसिंग वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंगुल - फातोर्डा येथील खून प्रकरणी संशयित पतीला अटक करण्यात आली आहे. अधिकचा पुढील तपास सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, मृत करिष्माचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricketer Retirement: अचानक मोठा निर्णय! रूटचा क्रिकेटला रामराम, 14 वर्षांच्या कारकिर्दीनंतर घेतला मोठा निर्णय

IPL Auction Goa: गोव्यात पुन्हा रंगणार 'आयपीएल'चा लिलाव; डिसेंबरमध्ये होणार भव्य आयोजन, 15-16 तारखेची शक्यता

Goa BJP: गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा मोठा संघटनात्मक बदल; भारती पवार प्रभारी तर अनिल अँथनी सहप्रभारी

Porvorim Elevated Road: अटल सेतूवरून पर्वरीत उतरण्याचा मार्ग अखेर खुला! मडगाव, वास्को, फोंडा, बांबोळीहून उत्तर गोव्याकडे जाणाऱ्या वाहनांना मोठा दिलासा

Goa Congress: 'गोवा काँग्रेस पक्ष' खरंच आधीपासून अस्तित्वात होता का? निवडणूक आयोग सोमवारी प्रतिज्ञापत्रातून उलगडणार पक्षाच्या नावाचे गूढ

SCROLL FOR NEXT