Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: तनुजा नाईक खूनप्रकरणी पती निर्दोष

Goa Crime News: 2017 मधील घटना : सहा वर्षानंतर संशयिताची मुक्तता

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: मडकईतील व्हरडवाडा - गावणे बांदोडा येथील २०१७ मधील गाजलेल्या तनुजा नाईक खून प्रकरणातील संशयित आरोपी आतिश नाईक याला फोंड्यातील जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष जाहीर केले.

आतिश हा तनुजाचा पती असून त्यानेच तनुजाचा खून केल्याच्या संशयावरून त्याला फोंडा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची रवानगी तुरुंगात केली होती. गेली सहा वर्षे आतिश नाईक तुरुंगात होता, मात्र आता त्याची निर्दोष सुटका झाली आहे.

तनुजा व आतिश या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. तनुजा ही मडगावातील एका महाविद्यालयात शिकत होती. तर आतिश हा कॅटरिंगचा व्यवसाय चालवत होता. मडगावात त्यांची ओळख झाल्यानंतर त्याचे रूपांतर प्रेमात झाले व नंतर दोघेही विवाहबद्ध झाली. विशेष म्हणजे या विवाहाला तनुजाच्या कुटुंबीयांचा विरोध होता.

गेल्या 3 जुलै 2017 मध्ये तनुजा आणि आतिश दोघेही व्हरडवाडा - गावणे येथील आपल्या घरी आले होते. मात्र संध्याकाळी तनुजा मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली होती. तनुजाचा मृतदेह खोलीत पडलेला होता, पण तिचा पती आतिश गायब झाला होता. त्यामुळे त्याच्यावरच संशयाची सुई होती, त्यानुसार फोंडा पोलिसांनी तपास केला असता, त्याला दुसऱ्या दिवशी ४ रोजी फोंडा बसस्थानकावर ताब्यात घेण्यात आले होते.

फोंडा पोलिसांनी या खुनाचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते, मात्र सबळ पुराव्याअभावी आतिश नाईक याची निर्दोष सुटका करण्यात आली. न्यायाधीश चोलू गावस यांनी हा निवाडा दिला.

गुदमरल्याने मृत्यू...

तनुजा नाईक हिचा मृत्यू गुदमरल्याने झाल्याचे शवचिकित्सा अहवालात स्पष्ट झाले होते. तनुजाला गुदमरून मृत्यू येण्याजोगे नेमके काय घडले होते, ते स्पष्ट झाले नव्हते. तरीपण पोलिस तपासात उशी तोंडावर ठेवल्याने ती गुदमरली होती, असे पोलिस तपासात नमूद करण्यात आले होते. त्यातच तनुजाचा पती आतिश नाईक पळून गेल्याने हा प्रकार आतिशनेच केल्याचा दावा पोलिसांनी केला होता, मात्र याप्रकरणी प्रत्यक्षदर्शी उपस्थित नव्हता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Unnatural Death Case: नागव्यात 17 वर्षीय मुलाची आत्महत्या; हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

SCROLL FOR NEXT