Human Trafficking News Dainik Gomantak
गोवा

Human Trafficking: नवजात मुलासह पत्नीला विकण्याचा कट; बंगालच्या 'पिंकू रॉय'ला गोव्यात ठोकल्या बेड्या

Bengal Man Arrested Goa: मानव तस्करीच्या एका मोठ्या प्रकरणात गुंतलेल्या आरोपीला जुने गोवे पोलिसांनी पश्चिम बंगालच्या ॲन्टी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटच्या मदतीने जुन्या गोव्यातून अटक केली

Akshata Chhatre

जुने गोवे: पश्चिम बंगालमधील कलिम्पोंग येथील मानव तस्करीच्या एका मोठ्या प्रकरणात गुंतलेल्या आरोपीला जुने गोवे पोलिसांनी पश्चिम बंगालच्या ॲन्टी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटच्या मदतीने जुन्या गोव्यातून अटक केली आहे. ३४ वर्षीय पिंकू रॉय असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो आसाममधील सिल्चर येथील रहिवासी आहे. जुन्या गोव्यातील 'आदलें गोयें' रेस्टॉरंटमध्ये तो वेटर म्हणून काम करत होता.

नेमके काय आहे प्रकरण?

कलिम्पोंग महिला पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, डॉ. ग्रॅहम्स अँड डिस्ट्रिक्ट, कलिम्पोंग येथील एका महिलेने पिंकू रॉय आणि कर्नाटकातील अरुण प्रकाश शेट्टी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारदार महिलेनुसार, तिचे २०१३ मध्ये बंगळूरु येथे पिंकू रॉयसोबत करारबद्ध पद्धतीने लग्न झाले होते. त्यानंतर १९ डिसेंबर २०२३ रोजी ते कलिम्पोंगला आले आणि स्थानिक साक्षीदारांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या लग्नाचा एक करार केला.

यानंतर ते बंगळूरुला परतले आणि नंतर केरळला स्थलांतरित झाले, जिथे ते तीन महिने राहिले. तिथून ते पुन्हा कर्नाटकात गेले आणि अरुण प्रकाश शेट्टी यांच्या मालकीच्या पिंगारा नावाच्या रेस्टॉरंटमध्ये दोघांनीही काम करण्यास सुरुवात केली.

नवजात बालकासह महिलेला विकण्याचा कट

या प्रकरणाला धक्कादायक वळण तेव्हा लागले जेव्हा ६ ऑगस्ट २०२४ रोजी पिंकू रॉय आणि रेस्टॉरंटचा मालक अरुण प्रकाश शेट्टी यांनी तक्रारदार महिला आणि तिच्या नवजात बालकाला कोणतीही माहिती न देता दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हेतू दोघांनाही विकण्याचा होता. सुदैवाने, या महिलेला तिथून पळून जाण्याची संधी मिळाली आणि तिने स्वतःचा आणि आपल्या नवजात बालकाचा जीव वाचवला.

पोलिसांची संयुक्त कारवाई आणि आरोपीला अटक

या गंभीर गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर, पश्चिम बंगालच्या कलिम्पोंग ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटच्या प्रभारी अधिकारी एलएसआय शांती लामा यांनी आपल्या पथकासह गोव्यात धाव घेतली. त्यांनी जुने गोवे पोलिस स्टेशनच्या टीमसोबत मिळून आरोपीचा शोध सुरू केला. कसून तपास आणि पाळत ठेवल्यानंतर, २९ जून २०२५ रोजी पिंकू रॉयला ओल्ड गोव्यातून अटक करण्यात आली.

अटक केल्यानंतर आरोपीला मर्सेस येथील जेएमएफसी न्यायालयात 'ट्रान्झिट रिमांड'साठी हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची ट्रान्झिट रिमांड मंजूर केली आहे. यानंतर, पश्चिम बंगाल ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटच्याचे पथक १ जुलै २०२५ रोजी आरोपीला घेऊन पुढील कार्यवाहीसाठी पश्चिम बंगालकडे रवाना झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

Krishna Janmashtami 2025 Wishes In Marathi: 'कृष्ण' जन्मला ग बाई... जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' गोड, नटखट शुभेच्छा

Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीचा शुभ योग; 'या' 3 राशींवर राहिल श्रीकृष्णाची कृपा, परदेश प्रवासाचीही सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT