Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Margao Crime: मडगाव प्रकरणातील संशयिताने यापूर्वीही युवतींना फसवल्याचे उघड, मानवी तस्करीचा संशय; पोलिसांकडून तपास सुरू

Goa Crime: तपासात अक्षता चराडकर या महिलेला मांजरेकर याने लेडी मॅनेजर म्हणून कामाला ठेवले होते, असे उघड झाले आहे.

Sameer Panditrao

मडगाव: सध्या मडगाव पोलिस ठाण्याच्या कोठडीत असलेला शबरीश मांजरेकर याने  यापूर्वीही अनेक  परप्रांतीय  युवतींना गोव्यात  केअरटेकर म्हणून कामाचे आमिष दाखवून फसवल्याचे पोलिस तपासात आढळून आले आहे.  

त्याची या गुन्ह्याची व्याप्ती बरीच मोठी आहे. मानवी तस्करीचा हा मामला असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. पोलिसांनी आपल्या तपासकामाला गतीने सुरुवात केली आहे.

तपासात अक्षता चराडकर या महिलेला मांजरेकर याने लेडी मॅनेजर म्हणून कामाला ठेवले होते, असे उघड झाले आहे. पोलिसांनी  शबरीश याने परराज्यातील युवतींना गोव्यात विविध ठिकाणी कामाला ठेवलेल्यांची आधार कार्डही  जप्त केली आहेत.  

 प्रकरण संवेदशील असल्याने तूर्त पोलिसांनी अधिक  माहिती देणे टाळले आहे.  सेनावली-वेर्णा येथे  त्याने मोहन जाधव या व्यक्तीसह भागीदारीने ‘एस.एम.होम के. सर्व्हिस’ नावाने कार्यालय सुरू केले होते. २०१६ साली त्यासाठी वेर्णा पंचायतीकडून परवाना घेतला होता. तो २०२० साली संपला होता. त्याचे नूतनीकरण करण्यात आले नव्हते.

त्याचबरोबर अक्षता चराडकर हिला लेडी मॅनेजर म्हणून ३१ मे २०२४ पासून  कामाला ठेवले होते. तिच्याबरोबर आता  मोहन जाधव हाही  पोलिस तपासाच्या रडारवर आला आहे. मडगाव  पोलिसांनी  अक्षता हिला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात हजर राहण्यास नोटीस बजाविली आहे. तर  सेनावली  येथील त्या ऑफिसची पोलिसांनी  झडती घेऊन  तो व्यावसायिक  परवाना जप्त केला आहे.

महिलेची जबानी नोंद

जिच्यावर कथित बलात्कार झाल्यावरून  मडगाव  पोलिस ठाण्यात तक्रार नोंद झाली होती. त्या महिलेने आपल्यावर बलात्कार झाला नसल्याचे पोलिस चौकशीत स्प्ष्ट केल्याने, तिची जबानी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर  नोंद करू करून तिला तिच्या मूळ गावी पाठवून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

Navelim: नावेली पंचायतीतील 2 पंच पोर्तुगीज, तक्रारीमुळे अपात्रतेचे संकट; सरपंच निवडणूक लांबणीवर

Gavandali: गवंडाळीतील उड्डाण पुलाच्या कामाला गती द्या! प्रवाशांची मागणी;अरुंद रस्त्यावर अडथळा, वाहनचालकांना त्रास

SCROLL FOR NEXT