Margao Crime News: फूटपाथवर राहणाऱ्या महिला मजूराच्या 2 महिन्यांच्या मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी नावेलीतील महिलेला अटक!

फुटपाथवर राहणाऱ्या एका महिला मजुराच्या मुलीचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार मडगावात उघडकीस आला आहे.
Margao Crime News
Margao Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Margao Crime News

फुटपाथवर राहणाऱ्या एका महिला मजुराच्या मुलीचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार मडगावात उघडकीस आला आहे. काल (20 फेब्रुवारी) ही घटना घडली असून याबाबत मडगाव पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, रेल्वे संरक्षण दल स्टेशनबाहेर फुटपाथवर महाराष्ट्रातील एक मजूर महिला आपल्या 2 महिन्यांच्या मुलीसोबत झोपली होती. यावेळी नातालीना आल्मेदा (48, नावेली) या महिलेने मुलीचे अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला. नंतर मुलीच्या आईने मडगाव पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली.

तपासाअंती, पोलिसांनी नातालीना हिला ताब्यात घेतले. तिने बाळाचे अपहरण करून आपल्याला फ्लॅटवर ठेवले असल्याचे समोर आले. पोलिसांनी बाळाला ताब्यात घेतले असून आईकडे सोपवले आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Suspicious Death
Senior Citizen Beaten To Death In Goa
Uttar Pradesh Girl Crime
Margao Woman Cheated 33 lakhs
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com