Margao Crime: सिगारेटची आक्षेपार्ह रिल्स करणं अंगलट; मडगावात दहापेक्षा अधिक जणांवर गुन्हा

Goa Margao Crime News: गोल्ड फ्लॅक इंडी मिंट सिगारेटची आक्षेपार्ह रिल्स बनवून ती इंस्टाग्राम व फेसबुकवर घातली होती.
Margao Crime
Margao CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Margao Crime News

मडगाव: एका सिगारेट कंपनीच्या सिगारेटची आक्षेपार्ह रिल्स बनवून नंतर ती सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे भलतेच साहस काही जणांच्या अंगलट आले आहे. मडगाव पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार नोंद झाली असून, पोलिसानी संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे.

जूनाथ प्रभू मळकर्णेकर हे तक्रारदार आहेत. १८ मार्च पूर्वी काही जणांनी गोलू या सोशल मीडियावर गोल्ड फ्लॅक इंडी मिंट सिगारेटची आक्षेपार्ह रिल्स बनवून ती इंस्टाग्राम व फेसबुकवर घातली होती. त्याचा आपल्या व्यवसायावर परिणाम झाला, असे तक्रारदाराने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

Margao Crime
Kadamba Strike: 'कदंबा'चा संप अखेर टळला! चालक, कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य; फॉन्सेकांनी दिली खुशखबर

राघव शर्मा, अस्ति सहनी, मोहम्मद फाहदे, नकुल पंडित, ऋषि गुप्ता, योगेश गालव, प्रथम सिंग, झुबेर शेख, फय्याज खान व इतरांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निलेश शिरवईकर पुढील तपास करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com