Drawing competition Dainik Gomantak
गोवा

Gomantak-Sakal Drawing competition: गोमन्तक-सकाळच्या स्पर्धेला उदंड प्रतिसाद

राज्यात 48 केंद्रांवर स्पर्धकांनी नोंदविला सहभाग

गोमन्तक डिजिटल टीम

कोरोनाच्या संसर्गामुळे तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा ‘गोमन्तक-सकाळ चित्रकला स्पर्धा’ आयोजित केल्याने विद्यार्थ्यांनी स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला. गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून ‘गोमन्तक-सकाळ’च्या वतीने आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा राज्यातील लाखो शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेली आहे. यापूर्वी जानेवारी २०२०मध्ये स्पर्धा घेण्यात आली होती. त्यानंतर जानेवारी 2023 मध्ये ही स्पर्धा होत आहे. कोरोना संकट टळले असले तरी खबरदारी घेण्याचा संदेश नकळतपणे या विद्यार्थ्यांनी चित्रातून दिला.

अशा चित्रांना विद्यार्थ्यांची पसंती

घनदाट जंगलाची सफर, आजी-आजोबासमेवत बागेत मनसोक्त बागडणारी मुले, पाण्याखाली असणारी अनोखी दुनिया, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या साहाय्याने होणारी ऑनलाइन शाळा, कोरोना काळातील योद्धे, मास्क घालून बॅंकेत किंवा बाजारपेठेत वावरणारे नागरिक, मिरवणुकीसाठी सजवलेला घोडा, ‘मी लस घेतली’ हे दाखविणारी मुले वाढदिवसाचा केक, आवडते कार्टून अशा विषयांना विद्यार्थ्यांनी पसंती दिली.

सकाळ चित्रकला स्पर्धा ही तीन पिढ्यांना जोडणारी एकमेव स्पर्धा असून, गेली 38 वर्ष अखंडितपणे आयोजित केली जाते. सामाजिक उपक्रमांसोबतच शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सकाळ एनआयईतर्फे (न्यूज पेपर इन एज्युकेशन) अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. मागील काही वर्षांपासून सर्वसाधारण विद्यार्थ्यांबरोबरच विशेष विद्यार्थी, आणि पालकांना सुद्धा स्पर्धेत सहभागी केले जात आहे.

- मृणाल पवार, संचालिका, सकाळ माध्यम समूह

शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच इतर क्षेत्रातील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने अनेक उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते. ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना आपला कलाविष्कार प्रकट करण्याची संधी मिळते. महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थीसुद्धा दरवर्षी या स्पर्धेची आवर्जून वाट पाहत असतात.

- महेंद्र पिसाळ, मुख्य कार्यपालन अधिकारी, सकाळ माध्यम समूह

ग्रामीण भागातही लोण : महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून लाखो विद्यार्थी रविवारी झालेल्या या स्पर्धेत सहभागी झाले होते. कुठे मैदानावर, कुठे वर्गखोल्यातील बाकड्यावर, कुठे सतरंजीवर, तर कुठे फरशीवर बसून ही मुले रंगरेषांच्या माध्यमातून व्यक्त होत होती. यंदाच्या स्पर्धेत राज्यातील शहरी, निमशहरी, ग्रामीण, दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसोबतच विशेष शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT