Fish Business in Goa: राज्यातील मत्स्य खवय्यांना आपल्या परिसरात मासे मिळावेत, या उद्देशाने मत्स्योद्योग खात्याने चार मोबाईल फिश व्हॅन्स खरेदी केली केल्या होत्या. यासाठी आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 47.26 खर्च करण्यात आले होते.
या फिश व्हॅन्स मासेमारी सहकारी संस्थांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती मत्स्योद्योग मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली.
अखिल गोमंतक सरकारी सहकारी संस्था - फोंडा, एकात्मिक गोवा कल्याण आणि विकास संस्था - माजोर्डा, झाश फार्म, गोवन फार्मर क्लब - सांगे यांना वितरीत करण्यात आल्या आहेत,असेही लेखी उत्तरात म्हटले आहे. आमदार दिगंबर कामत यांनी यासंदर्भात अतारांकित प्रश्न विचारला होता.
अखिल गोमंतक सरकारी सहकारी संस्था - फोंडा येथे असणारी वॅन म्हार्दोळ बायपास, वेलिंग, पतंतळ्ळी फोंडा, सकवार, धारबांदोरा, मोले , साकोर्डा, टिस्क-उसगाव, प्रियोळ, अप्पेवाडे आणि खांडेपार मासे विक्री करते.
एकात्मिक गोवा कल्याण आणि विकास संस्था - माजोर्डा येथील व्हॅन चांदर, कुडतरी, गिर्दोळी भागात असते. झाश फार्म व्हॅन साखळी, पर्वरी, जुने गोवा आणि मोरुड म्हापसा येथे मासे पुरवते.
तर गोवन फार्मर क्लब - सांगे येथील व्हॅन रिवण, जांबावली, नेत्रावळी, तिळामळ, काकोडे आणि वाडे सांगे येथे मासळी विक्री करते, असे उत्तर स्पष्ट केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.