Goa Congress Party Dainik Gomantak
गोवा

Goa: काँग्रेसच्या सोशल मीडिया ट्रेंडला देशभर प्रचंड प्रतिसाद

Goa: काँग्रेसने आज सुरू केलेल्या सोशल मीडियावरील नव्या मोहिमेला सर्व स्तरातून लोकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: काँग्रेसने (Goa Congress Party) आज सुरू केलेल्या सोशल मीडियावरील (Social Media) नव्या मोहिमेला सर्व स्तरातून लोकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या एका तासात ‘भाजपच्या लुटीविरुद्ध भारत’ हा ट्रेंड (Trend) देशभरात क्रमांक एकवर राहिला असून, सायंकाळी ४ वाजेपर्यंत या ट्रेंडला एक लाखाहून अधिक ट्विट (Tweet) मिळाले.

देशभरातील जनतेने सरकारविरुद्ध संताप व्यक्त करणारे हजारो व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले, असा दावा प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी आज जारी केलेल्या पत्रकातून केला आहे.सत्तापिपासू आणि भांडवलदार धार्जिण्या सरकार विरोधात आवाज बुलंद करत लोकांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. जानेवारी २०२१ पासून मोदी सरकार गॕस दरवाढ करीत आहे. गेल्या सात महिन्यांत प्रत्येक गॕस सिलिंडरमागे १९० रुपयांनी दरवाढ केली असून, हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.

गेल्या आठ महिन्यांत ६७ वेळा इंधन दरवाढ करण्यात आली आहे. खाद्यतेलांच्या किमती ५० टक्क्यांनी वाढवल्या आहेत. वाढत्या महागाईमुळे गरीब जनता आणि मध्यमवर्गीयांना जगणे कठीण झाले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या विषयावर पत्रकार परिषद घेऊन जनतेवर ही प्रचंड भाववाढ लादून सरकार हा सर्व पैसा कुठे नेत आहे, असे अनेक प्रश्न केले आहेत, असेही या पत्रकातून सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT