Dainik Gomantak
गोवा

Goa Government: फॅन्सी नंबरमुळे वाहतूक खाते मालामाल, महसुलात मोठी वाढ

दैनिक गोमन्तक

धीरज हरमलकर

Goa Government: राज्यात वाहनांना फॅन्सी क्रमांक (चॉईस नंबर) मिळवण्याचा लोकांचा कल वाढला आहे. वर्षभरात एकूण २,८२८ वाहनधारकांनी फॅन्सी क्रमांक मिळवले. त्यातून वाहतूक खात्याला एकूण रु.९,२९,३९,००० महसूल मिळाला आहे.

वाहनचालकांत विशेषतः तरुणांमध्ये लकी व फॅन्सी नंबर मिळविण्याकडे कल वाढला आहे. फॅन्सी क्रमांक मिळविण्याचे तर्कशास्त्रही भन्नाट आहे. काही लोक अंक शास्त्रावर विश्वास ठेवून आपल्या हवा तो नंबर मिळवतात तर काहींना क्रमांक लक्षात ठेवण्यास सोपे जावे यासाठी सोयीचा क्रमांक निवडतात.

गेल्या वर्षभरात पणजी आरटीओकडे ५३४, मडगाव- ४५४, फोंडा- २२३, डिचोली- १७२, वास्को- १७१, पेडणे- १५५, केपे- १११, काणकोण- ६३ आणि धारबांदोडा- २३ वाहने फॅन्सी क्रमांकांसाठी नोंदणीकृत झाली. फॅन्सी नंबरसाठी आरटीओकडे नोंदणी केलेल्या वाहनांची एकूण संख्या २,८२८ आहे. या नोंदणीतून एकूण रु. ९,२९,३९,००० महसूल मिळाला आहे.

वाहतूक उपसंचालक संदीप देसाई यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये म्हापसा आरटीओकडे फॅन्सी क्रमांक असलेल्या ७८१ वाहनांची नोंदणी होती. त्या वर्षी कार्यालयाला रु.२,१८,७९,००० चा महसूल मिळाला. २०२३ मध्ये ९२२ वाहने नोंदणी असून त्यातून रु. २, ७५,१६,००० चा महसूल मिळाला. फॅन्सी नंबरसाठी सर्वात कमी नोंदणी धारबांदोडा वाहतूक कार्यालयात झाली असून २०२२ मध्ये २० वाहने (४,२०,००० रुपये महसुल) तर २०२३ मध्ये २३ वाहने (७,२३,००० महसूल) नोंदणी झाली आहेत.

गतसाली सात कोटींची कमाई

२०२२ मध्ये मडगाव आरटीओकडे ४५३, पणजी - ४४३, फोंडा - २१०, वास्को - १६०, केपे - १०५, पेडणे - १०२, डिचोली - ९१, काणकोण - ५२ आणि धारबांदोडा - २० वाहने फॅन्सी क्रमांकांसाठी नोंदणीकृत झाली. या वर्षी वाहतूक विभागाला फॅन्सी क्रमांक नोंदणीतून एकूण ७,२२,६३,००० रुपये महसूल मिळाला आहे. फॅन्सी नंबरसाठी आरटीओकडे नोंदणी केलेल्या वाहनांची एकूण संख्या २,४१७ आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT