Air India Flight Landing Video Dainik Gomantak
गोवा

Flight Landing Video: विमान विमानतळावर कसे लँड होते? मोपा विमानतळावरील फ्लाईट लँडिंगचा कॉकपीटमधून बर्ड आय व्ह्यु

Airplane Landing Exclusive Video: लँडिंगपूर्वी पायलट खातरजमा करण्यासाठी काही प्रश्न विचात असून, समोरुन रेडी अशी प्रतिक्रिया ऐकू येत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

विमान प्रवास आता अनेकांसाठी सोईस्कर झाला असला तरी अजून अनेक सर्वसामान्य नागरिकांसाठी तो स्वप्नवतच आहे. हवाईमार्गे प्रवास करुन कमी वेळात खूप लांबचा पल्ला पार करता येतो. विमानाचे उड्डाण आणि लँडिंग या गोष्टींची नेहमीचे आकर्षण नागरिकांना असते. विज्ञानाच्या जादूमुळे शक्य होणाऱ्या या गोष्टींबाबत अनेकांना आकर्षण असते.

विमानाच्या उड्डाण आणि लँडिग या प्रक्रियेत अनेक वैज्ञानिक बाबींचा समावेश असतो. पण, प्रवासी म्हणून यावेळी येणारा अनुभव आणि पहायला मिळणारे नयनरम्य दृष्य़ ही पर्वणी असते. असाच एअर इंडिया विमानाच्या लँडिंगचा व्हिडिओ समोर आला आहे. एअर इंडियाचे विमान उत्तर गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ लँड होत असून, त्याचा हा अतिशय सुंदर व्हिडिओ आहे.

या व्हिडिओत विमान धावपट्टीवर उतरेपर्यंतचा प्रवास व्हिडिओद्वारे रेकॉर्ड करण्यात आला आहे. व्हिडिओत विमानाच्या कॉकपीटमध्ये दोन पायलट बसल्याचे दिसत आहे. धावपट्टी जवळ येताच त्यादृष्टीने पायलट तयारी करताना तसेच, आवश्यक सूचना देताना दिसत आहेत. लँडिंगपूर्वी पायलट खातरजमा करण्यासाठी काही प्रश्न विचात असून, समोरुन रेडी अशी प्रतिक्रिया ऐकू येत आहे.

चेकलिस्ट पूर्ण झाल्यानंतर विमान धावपट्टीच्या आणखी जवळ जाताना दिसत आहे. दोन्ही पायलट हळूवारपणे विमानाला धावपट्टीवर उतरले असून, त्याने आता धावपट्टीवर ताबा घेतला आहे. ठरलेले अंतर पूर्ण करुन विमान नियोजित ठिकाणी जाऊन थांबते. विमानाच्या लँडिंगचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Sand Mining Goa: राज्‍याची संपत्ती सांभाळा, बेकायदा वाळू उत्खननप्रकरणी अधिकाऱ्यांना न्‍यायालयाचे निर्देश

Communidade Land: सावईवेरे कोमुनिदाद कुणाच्या हिताआड येणार नाही पण...! पदाधिकाऱ्यांचे पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण

Ponda: सत्य न जाणता ढवळीकरांवर आरोप करू नका! बांदोडा सरपंचांचा पाटकरांना सल्ला, मतांचा घोळ झाल्याच्या दाव्याला उत्तर

Goa: जिल्हा न्यायालयात आजी-माजी खासदार-आमदारांवर 22 प्रकरणे, हायकोर्टातही 2 खटले प्रलंबित

Goa healthcare policy: महागडे उपचार आता सर्वांसाठी परवडणार; दुर्मिळ आजारांवरील औषधांसाठी राज्यात 'अभिनव किंमत' धोरण राबवण्याची सरकारची घोषणा

SCROLL FOR NEXT