CM Pramod Sawant Housie Ban  Dainik Gomantak
गोवा

Housie Ban: हाऊजी बंदीमुळे राज्यातील क्लब संकटात, GFA अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पुनर्विचारासाठी निवेदन

Goa football clubs and housie ban: निवेदन स्वीकारल्यानंतर याप्रकरणी लक्ष घालण्याचे आणि जीएफएला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती कायतान यांनी दिली.

Sameer Panditrao

पणजी: ग्रामपातळीवरील फुटबॉल स्पर्धांच्या वेळेस ‘हाऊजी’ला उदंड प्रतिसाद लाभतो, मात्र त्यावर दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक जुगार कायदा,१९७६ अंतर्गत बंदी घातली आहे, यामुळे स्थानिक क्लब संकटात सापडल्याची भूमिका गोवा फुटबॉल असोसिएशनने (जीएफए) घेतली असून यासंदर्भात संघटनेचे अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निवेदन सादर करुन याप्रकरणी पुनर्विचार करण्याची विनंती केली.

निवेदन स्वीकारल्यानंतर याप्रकरणी लक्ष घालण्याचे आणि जीएफएला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती कायतान यांनी दिली. हाऊजी बंदीचा फटका बसलेल्या ग्रामपातळीवरील क्लबनी सह्यांची मोहीम राबविणार असून त्याची सुरवात १४ एप्रिलपासून होईल. क्लबांचे संयुक्त सह्यांचे निवेदन दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले जाईल, अशी माहितीही कायतान यांनी दिली.

कायतान यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हाऊजी बंदीमुळे ग्रामपातळीवरील फुटबॉल क्लबांवर होणारा प्रतिकुल परिणाम स्पष्ट केला. हाऊजी हे क्लबसाठी मनोरंजनाबरोबरच उत्पन्नाचे सादर असल्याचे नमूद केले.

हाऊजीद्वारे मिळणारे उत्पन्न ग्रामपातळीवरील क्लब फुटबॉल व सामाजिक उपक्रमांसाठी वापरत असल्याची माहिती कायतान यांनी दिली. ग्रामपातळीवरील नोंदणीकृत क्लबतर्फे घेण्यात येणाऱ्या फुटबॉल स्पर्धांना पुरस्कर्ते आणि देणग्या कमी प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे अर्थप्राप्तीसाठी हाऊजीवर अवलंबून राहावे लागते.

त्यावर बंदी आल्यामुळे राज्यातील अनेक क्लबसमोर धोका निर्माण झाल्याचे कायतान यांनी मुख्यमंत्र्यासोबतच्या भेटीत अधोरेखित केले. नोंदणीकृत क्लब लेखापरीक्षित हिशेब सादर करताना, तसेच आर्थिक नियमांचे पालन करत असल्याचेही कायतान यांनी म्हटले आहे. गोवा फुटबॉल असोसिएशन राज्यातील ग्रामपातळीवरील फुटबॉलचे भविष्य सुरक्षित राखण्यासाठी वचनबद्ध आहे याकडे कायतान यांनी लक्ष वेधले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT