Effects of Flood in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Flood: 'का ग आम्हावर कोपली...' पुराच्या पाण्यात गेला संसार वाहून

हातावर पोट असलेल्या शिवाजीनगर, खडकी, सत्तरी (Satari) येथील हरीजनवाडा नागरीकांची व्यथा

दैनिक गोमन्तक

गुळेली: गोव्यात आलेल्या पुरामुळे (Goa Flood) अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहे . नदीच्या वाढलेल्या पाण्याखाली सत्तरीतील अनेक संसार गेले. सत्तरीतील (satari) वाळपई मतदार संघातील खोतोडा ग्रामपंचायत क्षेत्रातील शिवाजीनगर खडकी येथील अनेकांना या म्हादई नदीला आलेल्या पुरामुळे फटका बसला आहे. आज या ठिकाणी भेट दिली तेव्हा विदारक स्थिती समोर आली.या ठिकाणी असलेल्या बहुतेक घरांना नदीच्या पाण्याचा फटका बसला आहे तसेच घरे कोसळून अतोनात नुकसान झाले आहे. शिवाजीनगर येथील रणजित बुधो हरीजन,साजरो हरीजन,तृप्ती तिलू परवार यांची घरे कोसळली आहे. (Houses of the citizens of Satari village were destroyed by the floods)

साजरो हरिजन यांचे पूर्ण घर कोसळले आहे आणि आतील सामान वाहून गेले आहे.त्यांनी दिलेल्या माहितीनुसार घराचे सगळे पेपर व इतर सर्टीफिकेट असलेल्या लाकडी कपाटावर मातीच्या भिंती कोसळल्याने सगळ त्यात गडप झाले आहे. मातीचे ढिगारे अजून बाहेर काढलेले नाही त्यामुळे ढिगाऱ्याखाली जे काय आहे ते सगळ पाण्यात गेल्यातचं जमा आहे .

कोसळलेले एक घर

अंगावर सुद्धा आज शेजाऱ्यांनी दिलेले कपडे आपण घातले आहे आशी आर्त स्वरात ही माहिती दिली.एकूण घरातील सामाना वाहून गेले आहे असे ते म्हणाले.आता शेजाऱ्यांनी आसरा दिला आहे त्यामुळे कोसळलेला संसार उभा करत आहे.पंचायत मंडळाने सध्या भेट दिली आहे. जेवणाची पाकिटे देत.शेजारी मदत करीत आहेत.अशी माहिती साजरो हरीजन यांनी दिली.

खडकी सत्तरीतील साजरो हरीजन आपल्या घराची झालेली अवस्था...

रणजित बुधो हरिजन यांचे घराची मागील बाजू पूर्णपणे पूराच्या पाण्यात वाहून गेली आहे.व इतर घरात पाणी भरलेले होते सदर भिंती मातीच्या आहेत त्यामुळे त्यांनाही चिरा गेल्या असून घरात राहणे धोक्याचे बनले आहे .चूल तर अजून पेटलीच नाही शेजारी व नातेवाईकांनी दिलेल्या आधारामुळे आम्ही दोन घास खाऊ शकतो . घरात पाणी शिरल्यामुळे ते धोकादायक बनले आहे त्यामुळे आतील जे सामान राहिले आहे ते शेजाऱ्यांच्या घरी सध्या ठेवण्यात आले आहे असे ते म्हणाले.

मोठ्या कष्टाने उभारलेला संसार डोळ्यासमोर नेस्तानेबुत झाला...

तृप्ती तिलू परवार यांच्या घरात पहाटे चार च्या दरम्यान नदिचे पाणी शिरुन पूर्ण सामानाची नाशाडी झाली.आम्ही सुद्धा अजून चूल पेटवली नसून सामान जे पुरापासून वाचले आहे ते काढण्याचे काम चालू आहे .

पूर्णपणे चिखलात रुतलेले सामात काढण्याचे काम सध्या सुरू आहे.पण सगळचं पाण्याखाली गेल्यामुळे काय करावे,मुलांना कुठे झोपवावे अशा या पाणी पावसाच्या दिवसांत आम्ही कुठे जावे पंचायतीतर्फे शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे पण जो आमचा संसार नेस्तनाबूत झालाय त्याची भरपाई कशी होईल अशी माहिती स्नायू नयनांनी त्यांनी दिली.आपले शेजारी विलास हरीजन यांनी आम्हाला सध्या राहण्याची जेवणाची आंघोळ पाण्याची व्यवस्था केली आहे.सामाजिक संस्थाचे लोक चौकशी करायला येतात अशी माहिती त्यांनी दिली.

घरातील सामानाची झालेली दुरावस्था

खडकी येथील शिवाजी नगर हा भाग म्हणजे हरिजनवस्ती येथील सगळी मंडळी ही रोजंदारी वर काम करणारी त्यामुळे एकूण सध्या जी परीस्थिती उद्भवली आहे त्यामुळे त्यांच्यावर आभाळ कोसळले आहे. एवढ्या कष्टाने उभा केलेला संसार अशा प्रकारे डोळ्यांदेखत नेस्तानेबुत झाल्याने आता हातावर पोट असलेल्या या नागरिकांचे काय असा मोठा प्रश्न आहे. सरकारी पातळीवरून या कुटुंबायांना लवकरात लवकर मदत मदत मिळावी अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT