House Catches Fire At Mapusa Dainik Gomantak
गोवा

Mpausa News: खोर्लीत घरातील भाडेकरु खोलीला आग; शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता

अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले

Rajat Sawant

House Catches Fire At Mapusa: खोर्ली येथील घाटेश्वरनगरातील एका घराला आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत 3 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अग्निशामक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, खोर्ली येथील घाटेश्वरनगरातील एका घरातील भाडेकरू राहत असलेल्या खोलीला आग लागल्याची घटना आज घडली. भाडेकरू सकाळी खोली बंद करुन कामावर गेले होते.

आग लागल्याचे शेजाऱ्यांचे लक्षात येताच याबाबतची माहिती म्हापसा अग्निशमक दलाच्या जवानांना देण्यात आली. तोपर्यंत शेजाऱ्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला.

रहिवाशांच्या मदतीने अग्निशमक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवीले. आगीत सुमारे 3 लाखांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे.

पाटील कुटुंबीयांनी खोलीमध्ये दिवा पेटत ठेवला होता. त्यामुळे किंवा शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता अग्निशमक दलाने व्यक्त केली असून अग्निशमक दलाचे हवालदार प्रकाश कान्नाईक, साईराज नाईक, लविंदर साळगावकर, प्रवीण गावकर, सखाराम गावकर व साईल गावस या जवानांनी आग विझवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT