Ponda News: मुस्लिम समाजाविरुध्द आक्षेपार्ह पोस्ट; युवकाला न्यायालयीन कोठडी

शनिवारी सायबर क्राईमने एका संशयिताला ताब्यात घेतले होते.
Court
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Youth Allegedly Posting Objectionable Comments Against Islam Religion: सोशल मिडियावर बनावट इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आक्षेपार्ह पोस्टद्वारे राज्यातील मुस्लीम समाजातील धार्मिक सलोखा बिघडवल्याप्रकरणी सायबर क्राईमने एका संशयिताला ताब्यात घेतले होते. दरम्यान संशयिताला गुरुवारी फोंडा न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.

सायबर क्राईमचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत संशयिताला ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या स्वाधीन करणार असल्याची माहिती दिली होती.

Court
Goa Shipyard Limited: गोवा शिपयार्डची ‘मरिट्रॉनिक्स इंडिया’शी हातमिळवणी

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मोहम्मद पैगंबर यांना लक्ष्य करणारी अपमानास्पद इन्स्टाग्राम पोस्ट एका युवकाने केली होती. या पोस्टमुळे मुस्लिम बांधवांनी संबंधित व्यक्तीविरोधात मडगाव, पणजी, म्हापसा व इतर ठिकाणी पोलिसांत तक्रारी दाखल केल्या होत्या.

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास चालू केला. पोस्ट केल्यानंतर फाइंड मी इफ यू कॅन’ हे अकाऊंट अकाऊंटधारकाने बंद केले होते. त्यामुळे पोलिसांना तपासात अडचणी येत होत्या.

अखेर सायबर क्राईमचे पोलीस निरीक्षक विकास दयेकर आणि पोलीस काॅन्स्टेबल हेमंत गावकर यांनी संशयित साहिल गोपीनाथ नाईक (27) याला ताब्यात घेतले व पोलिसांच्या स्वाधीन केले.

गुरुवारी संशयिताला फोंडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com