Ponda News : विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचे आव्हान समर्थपणे पेलावे : आमदार गणेश गावकर

ग्रामीण भागातील युवकांचे स्वप्न पूर्ण केले आहे. आज येथे कमी खर्चात चांगल्या पदव्या मिळत आहेत.
MLA GANESH GAONKAR
MLA GANESH GAONKARDainik Gomantak
Published on
Updated on

Ponda News : फोंडा, स्पर्धा परीक्षेचा विचार करता गोव्यातील विद्यार्थी काहीसे मागे राहतात. गोमंतकीय विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचे आव्हान पेलायला हवे. त्यांना लागेल, ती आम्ही द्यायला तयार आहोत.

स्पर्धा परीक्षा कठीण नाही, हे आजच्या विद्यार्थ्यांनी भावी पिढीला दाखवून द्यावे,असे प्रतिपादन आमदार डॉ. गणेश गावकर यांनी केले.

धारबांदोडा येथील मल्टी फॅकल्टी महाविद्यालयात ‘गोवा आत्मनिर्भर फाउंडेशन’ची स्थापना करण्यात आली. त्यावेळी फाउंडेशनच्या उद्‍घाटनसमयी ते बोलत होते.

यावेळी धारबांदोडा ग्रामपंचायत सरपंच विनायक उर्फ बालाजी गावस, स्थानिक पंच कविता गावकर, फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश पाटील, उपाध्यक्ष उमेश पाटील, प्राचार्य डॉ. शेख मोहम्मद परवेज, शैलेश कुलकर्णी, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शैलेश कुलकर्णी यांनी लिहिलेल्या स्पर्धा परीक्षेविषयी माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी गणेश गावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

आमदार गावकर पुढे म्हणाले की,'' स्पर्धापरीक्षा संदर्भात आमच्या महाविद्यालयाच्या वतीने खास प्रयत्न केले जातील. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उतरावे म्हणून ठोस कार्यक्रम राबवले जातील. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा स्पर्धा परीक्षेला बसण्याची क्षमता आहे.

त्यांनी फक्त आपल्यातील न्यूनगंड बाजूला सारायला हवा. महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थीही स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करतील. यासाठी सर्वतोपरी मदत करायला मी तयार आहे.

उमेश दाणी, शैलेश कुलकर्णी यांची सुद्धा यावेळी भाषणे झाली. स्वागत उमेश पाटील यांनी केले.सूत्रसंचालन सोनम गोंधळेकर यांनी केले. या कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MLA GANESH GAONKAR
Goa Government: दिवाळी सुट्टीबाबत सरकारने पुनर्विचार करावा : लोलयेकर

धारबांदोड्यात‘आयआयटी’चे स्वागत

सरपंच विनायक उर्फ बालाजी गावस म्हणाले की, धारबांदोडासारख्या दुर्गम भागात महाविद्यालय सुरू करून गणेश गावकर यांनी ग्रामीण भागातील युवकांचे स्वप्न पूर्ण केले आहे. आज येथे कमी खर्चात चांगल्या पदव्या मिळत आहेत.

इथल्या विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक सुविधांचा लाभ घेऊन गावाचे नाव मोठे करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. पंचायतीच्या वतीने महाविद्यालयाला जी काही मदत हवी ती आम्ही वेळच्यावेळी प्राधान्याने देत राहू. आज आयआयटीसंदर्भात सर्वत्र ठिकाणी विरोध होत आहे.

तेव्हा धारबांदोडा पंचायत क्षेत्रात आयआयटीचे आम्ही स्वागत करू, असेही बालाजी गावस यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com