House and car fire in goa Dainik Gomantak
गोवा

Goa Fire News: राज्यात अग्नितांडव सुरूच; हडफडेत घराला तर वेरेत कारला आग

कळंगुटमधील घटना ताजी असतानाच नव्या दोन आगीच्या घटना समोर आल्या आहेत.

Shreya Dewalkar

Goa Fire News: कळंगुटमध्ये काही दिवसांपूर्वी सिलिंडरचा स्फोट होऊन ५० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्याची घटना ताजी असतानाच नव्या दोन आगीच्या घटना समोर आल्या आहेत. आज शनिवारी पहाटे हडफडे येथील इंदुमती दिवकर यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. तसेच वेरे येथे पर्यटकाची

चारचाकी आगीत जळून खाक झाली.

साकववाडी-हडफडे येथील श्री हनुमान मंदिराशेजारी इंदुमती दिवकर यांच्या घरी आज पहाटे इलेक्ट्रिक बोर्डमध्ये शॉर्टसर्किट झाले. यामुळे पूर्ण घराला आग लागली. ही घटना सकाळी सव्‍वापाचच्‍या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

मिळालेल्‍या माहितीनुसार या आगीत एकूण 4 लाखांचे नुकसान झाले असून, 8 लाखांची मालमत्ता वाचवण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

पर्यटक आर. विनायक रेड्डी (तेलंगणा) यांनी आपली चारचाकी वेरे येथे रेईशमागूस किल्ल्याशेजारी पार्क केली होती. त्यांच्या कारने अचानक पेट घेतला आणि पूर्ण कार आगीत जळून खाक झाली. अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Brazil Helicopter Crash: ब्राझीलमध्ये दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच भीषण टक्कर; 6 जणांचा मृत्यू, कार डीलरशिपच्या पार्किंगमध्ये कोसळल्याने 20 वाहने खाक VIDEO

Labh Drishti Rajyog: मंगळ आणि गुरुच्या संयोगाने बनतोय 'लाभ दृष्टी राजयोग'; 28 जूनपासून 3 राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

US Iran Peace Deal: अमेरिका-इराण शांतता कराराला इस्रायलचा सुरुंग; नेतन्याहूंचा ट्रम्प यांना फोन, लेबनॉनमधून सैन्य मागे घेण्यास साफ नकार

Goa Politics: शिरोड्यात राजकीय वातावरण तापले, अनेक संभाव्य समीकरणांचे संकेत; काँग्रेसच्या भूमिकेबाबत अद्याप अनिश्चितता

FIFA World Cup 2026: फिफा विश्वचषकात जर्मनीचा नवा इतिहास; कुरासाओचा 7-1 ने धुव्वा उडवत ब्राझीलचा 'तो' मोठा रेकॉर्ड मोडला

SCROLL FOR NEXT