Goa Monsoon Update: राज्यात पावसाची पुन्‍हा दमदार हजेरी

यलो अलर्ट : 26 ऑगस्‍टपर्यंत कोसळणार; 22 दिवसांनंतर झाला सक्रिय
Goa Monsoon Update 2023
Goa Monsoon Update 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Monsoon Update: अरबी समुद्र आणि भारतीय उपखंडाच्या मध्य भागात निर्माण झालेले कमी दाबाचे पट्टे तसेच ऑफ शोर टर्फस्‌ यामुळे राज्यात तब्बल २२ दिवस दडी मारलेल्या पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याच्‍या अंदाजानुसार २६ ऑगस्टपर्यंत राज्यात काही ठिकाणी तुरळक व मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. समुद्रात मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता असून मच्छीमारांना सतर्क राहण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे.

Goa Monsoon Update 2023
Goa Traffic News: ट्रॅफिक पोलिसांना पाहताच दुचाकीवरील तरूणाचा यु टर्न; पण पोलिसांनाच जाऊन धडकला... गाडीत बीअरचा कॅन

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सासष्टी, केपे, सांगे, तिसवाडी तसेच मुरगाव तालुक्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या ‘अल निनो’च्‍या स्थितीमुळे गेल्या काही दिवसांपासून पावसाने राज्यात दडी मारली होती. मॉन्सूनची ही स्थिती भारतीय उपखंडाला त्रासदायक ठरणार आहे. शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये केवळ ३० ते ३५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्‍यामुळे शेतीला फटका बसेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

5.1 टक्के अतिरिक्त पाऊस

तब्बल 15 दिवस उशिरा दाखल होऊनही गोवा राज्यात आजअखेरपर्यंत 5.1 टक्के अतिरिक्त पाऊस पडला आहे. गेल्या 24 तासांत 19.9 मिलिमीटर तर एकूण 2617.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सुरूवातीला उशिरा होऊन आणि मध्यंतरी ओढ देऊनही राज्यात या हंगामात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे.

Goa Monsoon Update 2023
2017 ते 22 मध्ये फळदेसाई नसल्यामुळेच सांगे 5 वर्षे मागे राहिले; वाढदिनी मुख्यमंत्र्यांचा फळदेसाईंवर कौतुकाचा वर्षाव

डोंगरउतारावरील शेतीला मिळाली नवसंजीवनी

राज्यात खरीप हंगामामध्ये 23,288 हेक्टर जमिनीवर भातशेतीची तर 2943 हेक्टरवर भाजीपाल्‍याची लागवड केली जाते. यात डोंगरउतारावरील भात आणि भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते, जी केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पावसाने दीर्घकाळ दडी मारल्यास या पिकांच्या वाढीवर विपरित परिणाम होतो. गेल्या 20-22 दिवसांमध्ये अत्यंत कमी पाऊस पडत होता. त्यामुळे पीक वाढीवर परिणाम होताना दिसत होता. मात्र आता पुन्हा मोठा पाऊस सुरू झाल्याने पिकाला फायदा होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com