Road Condition Dainik Gomantak
गोवा

Road Condition: ईस्टर्न बायपासचे हॉटमिक्सिंग सुरू

Road Condition: 6.43 कोटी रुपये खर्च : विजय सरदेसाई यांनी सरकारकडून मिळविली कामाला मंजुरी

दैनिक गोमन्तक

Road Condition: फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांच्या उपस्थितीत आर्लेम सर्कल ते पॉवर हाऊस जंक्शनपर्यंतच्या 3.2 किलोमीटर (एका बाजूने) व 3.2 किलोमीटर पॉवर हाऊस ते आर्लेम जंक्शन (दुसऱ्या बाजूने) ईस्टर्न बायपासच्या हॉटमिक्सिंगच्या कामाचा शुभारंभ झाला. या कामावर 6.43 कोटी रुपयांचा खर्च येणार असून हे काम दीड ते दोन महिन्यांत पूर्ण केले जाईल.

यासंदर्भात बोलताना आमदार सरदेसाई यांनी सांगितले की, हा रस्ता फातोर्डा, कुडतरी, मडगाव व नावेली या चार मतदारसंघांतून जातो. तरीही आपण या रस्त्यासाठी प्रयत्न केले व सरकारकडून मंजुरी मिळवली. त्या दिवशी आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या भेटीला याच कामासाठी गेलो होतो.

मात्र, लोकांनी या भेटीबद्दल तर्कवितर्क व्यक्त केले. कुठल्याही आमदाराकडे काम करून घेण्याची कुशलता गरजेची असते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात येणार आहेत. याच संधीचा फायदा घेत आपण या रस्त्यांच्या हॉटमिक्सिंगसाठी सरकारची मंजुरी मिळविली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT