Michael Lobo  Dainik Gomantak
गोवा

Calangute News: कळंगुटमधील हॉटेल व्यावसायिकांना खंडणीखोरांचा त्रास; आमदार लोबोंनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

एका व्यावसायिकाने लेखी तक्रार दिल्याची माहिती

Akshay Nirmale

Calangute MLA Michael Lobo: उत्तर गोव्यातील सुप्रसिद्ध कळंगुट बीच परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी असते. येथे पर्यटकांच्या सोयीसाठी अनेक लहानमोठी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आहेत. दरम्यान, येथील हॉटेल्सचालकांकडून खंडणी मागितल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. त्यामुळचे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी या प्रकरणी आज, मंगळवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली.

या भेटीत आमदार लोबो यांनी कळंगुटमधील गैरप्रकार मुख्यंत्र्याच्या कानावर घालत कडक कारवाईची मागणी केली आहे. मायकल लोबो म्हणाले की, माझा मतदारसंघ असलेल्या कळंगुटमध्ये खंडणीखोरांचे एक रॅकेट कार्यरत आहे.

येथील सुप्रसिद्ध हॉटेल-रेस्टॉरंट व्यावसायिकांकडून खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. या व्यावसायिकांनी घाबरून याची कुठेही वाच्यता केलेली नाही.

या व्यावसायिकांकडे प्रोटेक्शन मनीची मागणी काही गुंडांकडून केली जात आहे. भीतीपोटी या व्यावसायिकांनी मौन बाळगले आहे. एका हॉटेलचालकाने लेखी तक्रार दिली आहे. सध्या येथील सर्वच हॉटेल व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सध्या हा व्यवसाय करणाऱ्यांच्या पाठीशी उभारण्याची गरज आहे. आणि व्यावसायिकांना त्रास देणाऱ्यांना धडा शिकविण्याची गरज आहे, असे लोबो यांनी म्हटले आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वीच खुद्द आमदार लोबो यांच्याच हॉटेलमध्ये खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT