Tomato Price Hike Dainik Gomantak
गोवा

Tomato Price Hike : फलोत्पादन महामंडळाच्या गाळ्यांवरही टॉमेटो शंभरीपार; 108 रुपयाने विक्री

टॉमेटो ही जीवनावश्‍यक वस्तू ; त्‍याचे दर भिडले गगनाला

गोमन्तक डिजिटल टीम

Tomato Price Hike : टोमॅटोच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. तुटपुंज्या पगारात संसाराचा गाढा चालवायचा कसा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. फलोत्पादन महामंडळाच्या गाळ्यांवर ८० ते ९८ रूपये दराने टॉमेटोची विक्री होत होती. परंतु आता तेथेही दर वाढला असून १०८ रुपयांवर पोचला आहे.

वाढत्या महागाईची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसू नये, त्‍यांना वाजवी दरात भाजीपाला मिळावा यासाठी गोवा सरकारने गोवा फलोत्पादन महामंडळाची स्थापना केली. तेथे बाजारापेक्षा कमी दरात भाजीपाला उपलब्ध होतो.

परंतु गेल्या काही दिवसांपासून फलोत्पादन केंद्रात कांदा आणि बटाटा वगळता इतर पालेभाज्या तसेच फळभाज्यांच्या दरात वाढ होत आहे. बाजारात जो टोमॅटो 120 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहे, तोच टोमॅटो फलोत्पादन महामंडळाच्या गाळ्यांवर 108 रुपये किलो दराने विकला जातोय.

सरकारला गोरगरीब जनतेचे काहीच पडलेले नाही. टॉमेटो ही जीवनावश्‍यक वस्तू असून, त्‍याचे दर गगनाला भिडले आहेत. हे सरकार आपली जबाबदारी पार पाडण्यास अपयशी ठरले आहे. ‘अच्छे दिन’ म्हणत सत्तेत आलेल्या सरकारने जनतेला ‘बुरे दिन’ दाखविले आहेत.

सिसिल रॉड्रिगीस, ‘आप’च्‍या नेत्या

सरकार केवळ आपली खुर्ची सांभाळण्‍यात व्‍यस्‍त असून, सर्वसामान्‍यांच्‍या प्रश्‍‍नांकडे लक्ष द्यायला त्‍यांना वेळ नाही. सध्‍या टोमॅटोसह भाजीपाल्‍यांचे दर वधारले आहेत. सामान्‍य जनतेने जगावे कसे असा प्रश्‍‍न निर्माण झाला आहे. सरकारचे महागाईवर मुळीच नियंत्रण राहिलेले नाही.

उदय शिरोडकर, नागरिक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT