Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim: प्रामाणिक सोनारामुळे महिलेला मिळाले हरवलेले मंगळसूत्र, व्हॉट्‌सॲप ग्रुप ठरला फायद्याचा

lost gold mangalsutra returned: आज डिजिटल आदी विविध मार्गाने फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यातही काही घटनांवरून अजूनही ‘प्रामाणिकपणा’ काय? त्याचे प्रत्यंतर अधूनमधून येत असते.

Sameer Amunekar

डिचोली: आज डिजिटल आदी विविध मार्गाने फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यातही काही घटनांवरून अजूनही ‘प्रामाणिकपणा’ काय? त्याचे प्रत्यंतर अधूनमधून येत असते. साखळी येथील एका महिलेलाही असाच ‘प्रामाणिकपणाचा’ अनुभव आला आहे. हरवलेले जवळपास दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आठ तासांच्या आत या महिलेला परत मिळाले आहे.

यासंबंधीची माहिती अशी की, देसाईनगर-साखळी येथील प्रतिभा नाईक देसाई या काल (गुरुवारी) दुपारी बाजारातून घरी जात असताना वाटेत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हरवले होते. घरी पोहोचल्यानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रतिभा यांना धक्का बसला. रस्त्यावर हरवलेले हे मंगळसूत्र बाजारातील सोनार प्रदीप पावसकर यांना मिळाले होते.

स्वतः सोनार असल्याने रस्त्यावर मिळालेले मंगळसूत्र सोन्याचे असल्याची पारख करायला प्रदीप पावसकर यांना वेळ लागला नाही. त्यांनी त्वरित मंगळसूत्र मिळाल्याबद्दलची माहिती व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकली. ही माहिती सर्वत्र व्हायरल झाली.

दुसऱ्या बाजूने मंगळसूत्र हरवल्याच्या विचारात असतानाच, मंगळसूत्र बाजारातील सोनार प्रदीप पावसकर यांना मिळाल्याचे सायंकाळी प्रतिभा यांना समजले. लागलीच प्रतिभा यांनी पावसकर यांच्याकडे संपर्क साधला. मोबाईलवरील फोटोची शहानिशा केल्यानंतर मंगळसूत्र प्रतिभा नाईक देसाई यांचेच असल्याची पक्की खात्री पटली. त्यानंतर साखळीचे उपनगराध्यक्ष आनंद काणेकर यांना बोलावून त्यांच्याच हस्ते हे मंगळसूत्र प्रतिभा यांना देण्यात आले.

२० ग्रॅमचे मंगळसूत्र

हरवलेले मंगळसूत्र परत मिळाल्याने प्रतिभा नाईक देसाई यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. त्यांनी सोनार प्रदीप पावसकर यांना धन्यवाद दिले. हे मंगळसूत्र २० ग्रॅम अर्थातच २ तोळ्यांचे होते, अशी माहिती सोनार पावसकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शेवटच्या श्वासापर्यंत देशसेवा करणाऱ्या पर्रीकरांबाबतही ते खोटे बोलले होते; अरुण जेटलींनी धमकी दिल्याचा राहुल गांधींचा दावा हास्यास्पद - प्रमोद सावंत

Handwriting Competition: 'गोमंतक'तर्फे 40 दिवसांची राज्यस्तरीय हस्तलेखन स्पर्धा; आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

America-Russia Tension: 'रशियासोबत अणुयुद्धासाठी अमेरिका तयार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ; जागतिक राजकारण तापलं VIDEO

बँक कर्ज देण्यास मनाई करत असेल तर तक्रार करा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Goa News Live Update: माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT