Arrest Dainik Gomantak
गोवा

Honda: गाडी आडवी घातली, पंच सदस्यांना केली जबरी मारहाण; होंडा ग्रामस्थ संतप्त, 2 परप्रांतीयांना अटक

Honda punch assault case: होंडा पंचायतीचे पंच सदस्य गावकर यांना मारहाण केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यात राहुल कुमार व एस. मकंदर सक्तिवेल यांचा समावेश आहे.

Sameer Panditrao

वाळपई: होंडा पंचायतीचे पंच सदस्य दीपक गावकर यांना मारहाण केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यात राहुल कुमार (बिहार, सध्या राहणारा होंडा-सत्तरी) व एस. मकंदर सक्तिवेल (तामिळनाडू, राहणारा होंडा) यांचा समावेश आहे.

अटक करण्यात आलेले दोघेही होंडा औद्योगिक वसाहतीत असलेल्या केम्प्लास्ट कंपनीत काम करतात. मारहाणीचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस तपास सुरू आहे. पोलिस स्थानकात मोठ्या प्रमाणात होंडा गावकरवाडा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

गुरुवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास दीपक गावकर हे पंचायतीचे काम उरकून गावकरवाडा येथील आपल्या घरी जात असताना दोघांनी मोटारसायकलने जाऊन त्यांना अडवून मारहाण केली. त्यानंतर गावकर यांनी कसाबसा बचाव करत होंडा पोलिस आऊट पोस्टवर येऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्काळ हालचाल करत दोघाही संशयितांना अटक केली.

या हल्ल्यात दीपक गावकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्यावर, मानेवर, पोटावर तसेच शरीराच्या इतर भागांवर जखमा झाल्या आहेत. या मारहाणीवेळी गावकर यांच्या गळ्यातील सोनसाखळी तुटून त्यातील मोठा भाग गायब झाला आहे.

पोलिस स्थानकांत ग्रामस्थांची धाव

घटनेची माहिती मिळताच होंडा व गावकरवाडा परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने वाळपई पोलिस स्थानकात दाखल झाले व संशयितांना तातडीने अटक करण्याची मागणी केली. रितसर तक्रार दाखल झाल्यानंतर दोघांवर गुन्हा नोंद झाल्यानंतर अटक करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिस तपास सुरू आहे. अटक करण्यात आलेले दोघेही परप्रांतीय असून लोकप्रतिनिधीवर कोणतेही कारण नसताना हल्ला का करण्यात आला हे स्पष्ट झालेले नाही, असे पोलिसांनी सांगितले. यावेळी सरपंच शिवदास माडकर, इतर पंच सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT