Sagar Ekoskar Dainik Gomantak
गोवा

वादग्रस्त पोलिस उपअधीक्षक सागर एकोस्कर यांचा पाय आणखी खोलात!

गृह खात्याने मागितला पोलिस महासंचालकांकडून अहवाल

दैनिक गोमन्तक

मडगाव : वादग्रस्त पोलिस उपअधीक्षक सागर एकोस्कर यांच्‍या अडचणी अधिकच वाढत चालल्‍या आहेत. फ्लोयड कुतिन्हो यांनी त्‍यांच्‍याविरोधात केलेल्या तक्रारीवर चौकशी करून गृह खात्याला अहवाल द्यावा असा आदेश पोलिस महासंचालकांना देण्यात आला आहे.

एकोस्कर हे मायणा कुडतरी-पोलिस स्थानकाचे निरीक्षक असताना त्यांनी आपल्याविरोधात खोटा गुन्हा नोंद केला होता. तसेच त्या गुन्ह्यातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी 10 लाख रुपयांची लाच मागितली असा आरोप कुतिन्हो यांनी केला होता. याबाबत त्‍यांनी राष्ट्रपती कार्यालयात तक्रार केली असता, त्या कार्यालयातून हे प्रकरण गोवा सरकारच्या गृह खात्याकडे सुपूर्द करण्‍यात आले होते.

यानंतर गृह खात्याचे अव्वल सचिव प्रीतिदास गावकर यांनी २ मे रोजी पोलिस महासंचालकांच्या कार्यालयास पत्र लिहून या तक्रारीची दखल घेऊन त्वरित चौकशी करावी आणि त्याचा अहवाल गृह खात्याला सादर करावा असे म्हटले आहे.

दरम्‍यान, सागर एकोस्कर हे अत्यंत वादग्रस्त पोलिस अधिकारी असून मेळावळी येथे आयआयटी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या महिलांना बुटांनी तुडवल्‍याचा आरोप यापूर्वी त्यांच्यावर झाला होता. तसेच अन्‍य प्रकरणांतही ते वादग्रस्‍त ठरले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Goa: 'चोला' चित्रपटाला करणी सेनेचा विरोध; भगवे कपडे, तुळस- रुद्राक्षाच्या सीनवर आक्षेप, यॉटवर ज्येष्ठ अभिनेत्यासमोर राडा

Goa Live News: सायबर घोटाळ्याप्रकरणी 24 जण अटकेत!

Kartik Aaryan: ना गाजावाजा न कसाला धिंगाणा; कार्तिकने गोव्यात शांततेत साजरा केला वाढदिवस पाहा Photo, Video

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात चहा, कॉफीसारखे गरम पेय का टाळावेत?

Cash for Job Scam: त्या 'मॅडम'ला पकडून देण्याचा गोमंतकीयांनी निर्धार केलाय! Cash For Job प्रकरणावरुन सरदेसाई पुन्हा बरसले

SCROLL FOR NEXT