Amit Shah
Amit Shah Dainik Gomantak
गोवा

Amit Shah: दक्षिण गोव्यात अमित शहा यांची 'या' दिवशी जाहीर सभा; लोकसभेची तयारी...

गोमंतक ऑनलाईन टीम

Amit Shah Rally in Goa: लोकसभा निवडणुकीला आता केवळ काही महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्या पार्श्वभुमीवर आता दक्षिण गोव्यातील जागा काहीही करून जिंकण्यासाठी भाजप प्रयत्नशील राहणार आहे. त्यासाठीच 16 एप्रिल रोजी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा हे दक्षिण गोव्यात सभा घेणार आहेत. या सभेतून तसेच कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीतून शहा हे एकप्रकारे प्रचाराची सुरवातच करतील.

आगामी वर्षातील लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभुमीवर भाजपने आधीपासूनच त्यांच्या मिशन 2024 ला सुरवात केली आहे. ज्या लोकसभा मतदारसंघात भाजप कमकुवत आहे, तिथे केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते वारंवार दौरा करत आहेत.

गोव्यात भाजपची सत्ता असली तरी दक्षिण गोवा लोकसभा मतदार संघातील खासदार काँग्रेसचा आहे. त्या पार्श्वभुमीवर आता गोव्यातील लोकसभेची तयारीही भाजपकडून केंद्रीय स्तरावर सुरू झाली आहे.

त्यातूनच आता भाजपचे नेते आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची दक्षिण गोव्यात सभा होणार आहे. येत्या 16 एप्रिल रोजी ही सभा होणार आहे. गोव्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अनौपचारिक बिगुल म्हणून या सभेकडे पाहिले जात आहे.

गतवेळी या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन हे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी माजी खासदार भाजपचे अॅड. नरेंद्र सावईकर यांचा पराभव केला होता. सावईकर हे 2014 ते 2019 या काळात खासदार होते. तर उत्तर गोव्यातून भाजपचे श्रीपाद नाईक विजयी झाले होते.

यंदा मात्र दक्षिण गोव्याचीही जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचा भाजपचा मनसुबा आहे. त्यासाठी मोर्चेबांधणीही केली जात आहे.

केंद्रीय आयटी तथा कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याकडे भाजपने याआधीच दक्षिण गोवा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. शिवाय केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्याकडेही विशेष जबाबदारी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: भारतीय नौदलाच्या विमानाचे दाबोळीवर आपत्कालीन लँडिंग, चार फ्लाईट्स वळवल्या

Pernem News : पेडणे तालुक्यातील रस्त्यांची ‘वाट’; रस्ते पावसाळ्यापूर्वी तरी दुरुस्त होतील का

Goa Today's Live News: कळंगुट येथे टॅक्सी चालकाला पर्यटकांकडून मारहाण

Bicholim Volleyball League : सर्वण येथे व्हॉलिबॉल लीगला सुरवात; आठ संघांचा सहभाग

Goa Traffic Violations: वाहतूक उल्लंघन ; चार महिन्यांत ९ कोटींचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT