Tigers Declining in Goa: चिंताजनक! गोव्यात वाघ होताहेत कमी; म्हादई, मोले अभयारण्यात वाघांच्या संख्येत घट...

शिफारसी करूनही व्याघ्र प्रकल्प अद्याप कागदावरच
Tigers declining in Goa
Tigers declining in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Tigers declining in Goa: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच देशातील व्याघ्र गणणा जाहीर केली. या 2022 च्या व्याघ्र स्थितीच्या अहवालानुसार भारतातील वाघांची संख्या वाढून 3,167 वर पोहोचली आहे.

देशातील स्थिती वाघांबाबत चांगली असली तरी गोव्यात मात्र वाघांच्या संख्येत घट झाल्याचे समोर आले आहे. गोव्यातील म्हादई, मोले अभयारण्यातील वाघांच्या संख्येत घट झाल्याची माहिती आहे.

Tigers declining in Goa
Goa Tourist Rash Driving: गोव्यात काहीही केले तरी चालते? एन्जॉयच्या नावाखाली पर्यटक तरूणींचा 'रेंट अ कार'मधून धोकादायक प्रवास

गोव्यासह-कर्नाटक सीमेवरील पश्चिम घाटात वाघांची संख्या कमी झाली आहे. अद्याप राज्यनिहाय आकडेवारी जाहीर केलेली नसली तरी, पश्चिम घाटाच्या या भागात वाघांची संघ्या घटली आहे. जंगलतोड, जंगलातील वाढता मानवी हस्तक्षेप, विकासप्रकिया ही या पाठीमागील कारणे आहेत.

अलीकडील डेटानुसार पश्चिम घाटात काही भाग वगळता वाघांचा अधिवास घसरत चालला आहे. दांडेली येथे वाघांचा वावर वाढला असला तरी सीमाभागात तो कमी झाला आहे.

व्याघ्रगणनेसाठी, भारतातील अधिवासांची पाच भागात विभागणी केली होती. शिवालिक-गंगेचे मैदान, मध्य भारत आणि पूर्व घाट, पश्चिम घाट, ईशान्य टेकड्या आणि ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे, सुंदरबन असे हे पाच भाग आहे. प्रत्येक लँडस्केपचे स्वतंत्र युनिट म्हणून विश्लेषण केले गेले.

Tigers declining in Goa
Goa Traffic Police Accident: देवदर्शनाला गेलेल्या वाहतूक पोलिसांच्या गाडीला अपघात; एका कॉन्स्टेबलचा मृत्यू

दरम्यान, पश्चिम घाटात सर्वाधिक जैवविविधता आढळून येते. तरी, अलीकडच्या काळात विकासाच्या प्रक्रियेत वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्षही वाढत चालला आहे. 2018 पर्यंत येथे वाघांची संख्या 981 होती, 2022 मध्ये ती 824 झाली.

आता 2022 च्या अहवालात मात्र काही ठिकाणी वाघांची संख्या कमी झाल्याचे नमूद केले आहे. व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या स्थिर असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या शिफारशी असूनही गोव्याने अद्याप संरक्षित क्षेत्रामध्ये व्याघ्र प्रकल्प तयार केलेला नाही.

गोव्यातील मोलेम-म्हादई येथे व्याघ्र प्रकल्पाची शिफारस असूनही त्याची निर्मिती अद्याप केली गेलेली नाही. अद्याप हा व्याघ्र प्रकल्प कागदावरच आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com