mayem fire News  Dainik Gomantak
गोवा

मये येथे घराला आग, लाखो रुपयांचे नुकसान

या आगीत घराचे फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक

दैनिक गोमन्तक

डिचोली : चिमूलवाडा-मये येथे एका घराला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडली. उल्हास रेडकर यांच्या घराला ही आग लागली. आग नेमकी कशी लागली, त्याचे कारण स्पष्ट नसले, तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत रेडकर यांचे 5 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. रेडकर यांची अर्धांगवायूने त्रस्त वृद्ध आई या घटनेतून मात्र सुखरूप बचवल्या आहेत.

माजी आमदार नरेश सावळ यांचे चालक उल्हास रेडकर यांच्या घरात ते राहत असलेल्या भागाला आग (fire) लागली. या आगीत घराचे फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या आहेत.

अग्निशामक दलाला घटनेची माहिती मिळताच, दलाचे अधिकारी श्रीपाद गावस यांच्या मार्गदर्शनाखाली दलाच्या जवानांनी बंबसह घटनास्थळी धाव घेतली. लिडींग फायर फायटर प्रल्हाद देसाई आणि महादेव गावस यांच्या नेतृत्वाखाली शैलेश साळकर (चालक-ऑपरेटर), रावजीराव राणे, संदीप गावस जितेश नाईक आणि संदीप परब या दलाच्या जवानांनी मदतकार्य करून आग विझवली. रात्री उशिरापर्यंत मदतकार्य चालू होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

Sexual Harassment Case: मनोरंजन विश्वात खळबळ! 'महाभारत' फेम 'भीम' सौरव गुर्जरला अटक; लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली 14 दिवसांची कोठडी

Madgaon Massacre 1890: स्मरण मडगाव हत्याकांडाचे! 21 सप्टेंबर 1890 रोजी मतदानाचा अधिकार मागणाऱ्या निःशस्त्र गोवेकरांवर गोळीबार; 23 जणांचा बळी

Child Writer: 'गौरवी, असेच आणखी लिहीत जा'; 10 वर्षांच्या बाललेखिकेच्या 29 निबंधांना मुख्यमंत्र्यांची दाद, पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन

Asian Games Final 2026: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया रचणार इतिहास? फायनलसाठी भारताची ताकदवान फौज तयार; 'अशी' असणार संभाव्य प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT