Jail Arrest Dainik Gomantak
गोवा

Goa Theft: गोव्यातील हॉस्पिटलमध्ये केली चोरी, मुंबईला गेला पळून; लोकेशन ट्रेस झाल्यामुळे सराईत चोरटा जेरबंद

Shetye Hospital Theft Goa: संशयिताला रविवारी गोव्यात आणल्यानंतर रितसर अटक करण्यात आली. त्याला मडगावच्या प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, अधिक तपासासाठी पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: होली स्पिरिट चर्चजवळील शेट्ये आय इस्पितळ चोरी प्रकरणाचा फातोर्डा पोलिसांनी यशस्वी छडा लावताना सराईत चोर इम्रान अख्तर अन्सारी (३९) याच्या मुसक्या शनिवारी मुंबईतील मुंब्रा येथे आवळल्या.

संशयिताला रविवारी  गोव्यात आणल्यानंतर रितसर अटक करण्यात आली.  त्याला मडगावच्या प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, अधिक तपासासाठी पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. १ डिसेंबर रोजी इम्रानने शेट्ये आय इस्पितळामधील  काउंटरमधून अडीच लाखांची रोकड पळवून नेली होती.

या इस्पितळाचे व्यवस्थापक प्रशांत नाईक यांनी मागाहून याप्रकरणी फातोर्डा पोलिसांत तक्रार नोंद केली होती. भारतीय न्याय संहितेच्या ३०५ कलमाखाली पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा नोंद केला होता.  पोलिसांना तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही महत्त्वाचे धागेदोरे सापडले होते.

त्याआधारे फातोर्डा पोलिस ठाण्याचे निरीक्षक नॅथन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासकामास  सुरुवातकेली असता, यात मुंब्रा भागातील सराईत चोर इम्रान हा गुंतला असल्याचे स्पष्ट झाले होते.  उपनिरीक्षक सचिन पाटील, हवालदार नीलेश कासकर, सत्यवान गावकर यांचे पोलिस पथक मुंबईला पाठविले होते. या पथकाने इम्रानला जेरबंद केले.  शेट्ये इस्पितळात चोरी केल्यानंतर तो मुंबईला गेला. परंतु पोलिसांनी त्याचे लोकेशन मिळविले. त्याआधारे पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला अखेर जेरबंद केले .

संशयित सराईत गुन्हेगार

संशयित इम्रान हा पूर्वी दुबईत  वाहनचालक म्हणून कामाला होता. त्यानंतर तो मुंबईत आला. तेथे तो टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करीत होता. त्याच्याविरोधात मुंबईतील घाटकोपर, विले पार्ले  पोलिस ठाण्यांत चोरीचे गुन्हे नोंद आहेत. संशयितांकडून पोलिसांनी ३४  हजार रोख रुपये जप्त केले.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: 'आग लागली तेव्हा आम्ही नव्हतो!' लुथरा बंधूंचा लंगडा युक्तिवाद, दिल्ली कोर्टाचा दिलासा देण्यास नकार; 'गोव्याचे उत्तर' ठरणार निर्णायक

Serendipity Arts Festival Goa: कला आणि संस्कृतीचा गोव्यात महासंगम! 12 ते 21 डिसेंबरदरम्यान सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल

Goa Nightclub Fire: गोवा नाईट क्लब आग प्रकरण! दोषींवर कठोर कारवाई होणारच; मुख्यमंत्री सावंत आक्रमक

बेळगावचे विभाजन होणार? नवीन तीन जिल्हे निर्माण करण्याची मागणी; अधिवेशनात चर्चा

Goa Live Updates: आग लागलेली असतानाच लुथरा बंधूंनी थायलंडचे केले तिकीट बुक

SCROLL FOR NEXT