Baina Theft: चोरी केली आणि गेले पोलीस चौकीसमोरून! बायणा दरोड्याबाबत धक्कादायक बातमी समोर; दरोडेखोरांचा नियोजनबद्ध चकमा

Baina Robbery: बायणा येथील दरोड्यानंतर दरोडेखोर पोलिसांना चकमा देत रेल्वेने मुंबईला पोहचले खरे. परंतु आठव्या दिवशी पोलिसांनी त्यांच्यापैकी सहाजणांच्या मुसक्या आवळल्या.
Baina Robbery
Baina TheftDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: बायणा येथील दरोड्यानंतर दरोडेखोर पोलिसांना चकमा देत रेल्वेने मुंबईला पोहचले खरे. परंतु आठव्या दिवशी पोलिसांनी त्यांच्यापैकी सहाजणांच्या मुसक्या आवळल्या. सर्वांत आश्र्चर्याची गोष्ट म्हणजे, बायणा किनाऱ्यावर मुरगाव पोलिसांची एक चौकी आहे. नियोजनबध्दरित्या ती चौकी टाळून हे दरोडेखोर पुढे गेल्याचे दिसून येते.

दरोडा घातल्यावर दरोडेखोर गेले कोठे यासंबंधी येथे चर्चा सुरू झाली होती. त्यासाठी अनेक तर्क-वितर्क करण्यात येत होते. बायणा येथील सागर नायक यांच्या फ्लॅटवर १८ रोजी मध्यरात्री दरोडे घालण्यात आला होता.

रेल्वेमार्गावरून चालत ते वास्को रेल्वे स्थानकापर्यंत आले. मात्र, तेथे पहाटे जाणारी रेल्वे नव्हती. त्यामुळे ते सर्वजण एका वाहनातून करमळी रेल्वे स्थानकावर आले. तेथे मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेने ते ठाणे (महाराष्ट्र) येथे उतरले. त्यानंतर ते कल्याण, भिवंडी वगैरे भागात विखुरले गेले.

Baina Robbery
Baina Dacoity: बायणा दरोड्याचा सूत्रधार भेळपुरीवाला! महाराष्ट्र, ओडिशातून 6 संशयितांना अटक

पकडण्यात आलेल्या सहाजणांपैकी सुरेश उर्फ गोलक हा सागर नायक यांच्याकडे काही दिवस कामाला होता. त्या काही दिवसांच्या कालावधीत त्याने दरोड्यासंबंधी योग्य अभ्यास केला. त्यानंतर आपल्या सहकाऱ्यांसमवेत १८ रोजी दरोडा घातला. या गोलकाचे काही कारनामे समोर येऊ लागले आहेत. दरोडे घातल्यावर त्यांनी मागे कोणताही पुरावा ठेवला नव्हता. परंतु शेवटी ते सहाजण पोलिसांच्या हाती लागलेच.

Baina Robbery
Baina Theft: 'पोलिसांनी शोधले असते तर, चोर सापडले असते'! बायणा दरोड्यातील जखमीचा धक्कादायक खुलासा; सांगितला संपूर्ण थरार

कॅमेऱ्यांना चकवत गाठले रेल्वे स्टेशन

दरोडा घातल्यावर दरोडेखोर इमारतीच्या मागील असलेल्या कुंपणावरून उड्या मारून पुढे निघाले. तेथून ते काटेबायणाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे आले. तेथून ते पूर्वीच्या बायणा पोलिस चौकीसमोरच्या रस्त्यावरून पुढे निघाले. बायणातील रवींद्र भवनसमोरून जाताना त्यांच्या छबी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या. मात्र, त्यांनी चेहरे झाकलेले असल्याने त्या छबीचा उपयोग झाला नाही. तेथील रस्त्याने ते बायणा किनाऱ्यावर गेले. किनाऱ्यावरून चालत ते शेवटच्या टोकापर्यंत गेल्यावर देस्तेरो रस्त्याने जवळच्या रेल्वेमार्गावर आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com