Calangute Theft Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; ‘हिस्ट्री शीटर’ला अटक

सीसीटीव्ही फुटेज, संशयिताचे वर्णन आणि प्राप्त माहितीच्या आधारे डिचोली पोलिसांनी राय-मडगाव येथून त्याच्या मुसक्या आवळल्या. ही घटना आठ दिवसांपूर्वी घडली होती.

दैनिक गोमन्तक

मुळगाव येथील एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावल्या प्रकरणी डिचोली पोलिसांनी अन्सार चमनसाब नारंगी( रा.हाऊसिंग बोर्ड, घोगळ-मडगाव) या ‘हिस्ट्रीशीटर’ संशयिताच्या मुसक्या आवळल्या असून, त्याच्या साथीदाराचा शोध जारी आहे.

सीसीटीव्ही फुटेज, संशयिताचे वर्णन आणि प्राप्त माहितीच्या आधारे डिचोली पोलिसांनी राय-मडगाव येथून त्याच्या मुसक्या आवळल्या. ही घटना आठ दिवसांपूर्वी घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १४ ऑगस्ट रोजी मुळगाव येथील कमल शिरगावकर या महिलेच्या गळ्यातील जवळपास १.९५ लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसकावण्याची घटना घडली होती.

कमल शिरगावकर या आपल्या घराजवळ फुले तोडताना दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने ती पाठमोरी असताना तिच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून नंतर दुचाकीवरून पळ काढला होता.

याप्रकरणी कमल यांनी त्याचदिवशी डिचोली पोलिसांत तक्रार दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी ‘भादंसं’च्या ३७९ आणि ३५६ कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. तपासाअंती मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितास अटक केली. पोलिस उपअधीक्षक सागर एकोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डिचोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहूल नाईक यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने ही मोहीम फत्ते केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT