Goa Fake Call: युवतीच्या खुनाचा बनावट फोन पोलिसांची भंबेरी...

पोलिसांची भंबेरी : म्हापसा, शिवोली, हणजूण परिसरात शोधाशोध
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

Goa Fake Call: एका युवतीचा खून झाल्याचा निनावी फोन गोवा पोलिसांच्या कंट्रोल रुमला आला आणि एकच खळबळ उडाली. या फोननंतर पोलिसांसह प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ झाली. म्हापसा, कोलवाळ व हणजूण पोलिसांनी या कॉलनुसार शिवोली परिसरात शोधाशोध केली असता, चौकशीअंती हा बनावट कॉल मद्यपीने केल्याचे समोर आले आणि पोलिसांचा जीव अखेर भांड्यात पडला.

Goa Police
President Draupadi Murmu: राष्ट्रपतींकडून आझाद मैदानावरील स्मारकाला भेट; हुतात्म्यांना आदरांजली

उपलब्ध माहितीनुसार, आज मंगळवारी (ता.२२) सकाळी साडेदहाच्या सुमारास शिवोलीमधील होली क्रॉस परिसरात एका युवतीचा खून झाल्याचा निनावी फोन कंट्रोल रुमला आला. त्यानंतर, तात्काळ म्हापसा पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

हा परिसर तीन पोलिस स्थानकांच्या सीमा भागांत येत असल्याने म्हापसा, शिवोली व हणजूण पोलिसांनी या परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला.

तसेच ज्या क्रमांकावरुन हा फोन आलेला, त्याचा पत्ता शोधला असता, तो इसम शिवोलीत सापडला. सुमारे तासभर पोलिसांची धावपळ सुरू होती.

Goa Police
Goa Starry Dog: परदेशी महिलेचे प्राणीप्रेम बेतले; ज्येष्ठ नागरिकाच्या जीवावर

या कॉलरचा शोध घेण्यास एका पंचसदस्याची पोलिसांना मदत झाली. कॉलरचे नाव जॉर्डन आहे.‘त्‍याचे’ मानसिक संतुलन बिघडलेले

संशयिताने घरातून आपल्या मोबाईलवरुन कंट्रोल रुमला फोन केल्याचे त्याच्या कॉल लॉग तपशीलातून आढळले.

हा तरुण मद्यपी असून त्याचे मानसिक संतुलन बरोबर नसल्याचे समोर आले. त्यानंतर, संबंधितास पोलिस स्थानकात आणून त्याची चौकशी करुन त्याला पुन्हा घरी पाठविण्यात आले. या प्रकारामुळे पोलिसांची मात्र बरीच भंबेरी उडाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com