Basilica Of Bom Jesus 1855 Photo Dainik Gomantak
गोवा

Oldest Photograph Of Goa: गोव्यातलं सर्वात जुनं छायाचित्र कोणतं? सोशल मीडियावर रंगली चर्चा; 1855 सालच्या फोटोनं वेधलं लक्ष

Basilica Of Bom Jesus 1855 Photo: फोटोग्राफी (Photography) ही केवळ कला नसून ती काळाला एका चौकटीत कैद करण्याचा एक मार्ग आहे.

Manish Jadhav

पणजी: फोटोग्राफी (Photography) ही केवळ कला नसून ती काळाला एका चौकटीत कैद करण्याचा एक मार्ग आहे. पण, पोर्तुगीजांच्या राजवटीखालील गोव्यात कॅमेरा पहिल्यांदा कधी पोहोचला आणि गोव्याचे सर्वात जुने छायाचित्र कोणते असावे? हा प्रश्न आजही इतिहासप्रेमी आणि संशोधकांसाठी कुतूहलाचा विषय आहे. नुकत्याच समोर आलेल्या काही माहितीनुसार, गोव्यातील फोटोग्राफीचा इतिहास 1840 ते 1860 च्या सुरुवातीच्या कालखंडापर्यंत मागे जातो.

सध्या उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक दस्तऐवजांनुसार, गोव्यातील (Goa) सुरुवातीच्या छायाचित्रांमध्ये प्रामुख्याने जुने गोवेतील भव्य चर्च आणि स्मारकांचा समावेश आहे. संशोधकांच्या मते, 1855 ते 1862 या कालखंडातील 'बॅसिलिका ऑफ बॉम जीझस' (Basilica of Bom Jesus) चे एक छायाचित्र हे गोव्यातील सर्वात जुन्या छायाचित्रांपैकी एक मानले जाते. त्या काळी छायाचित्रण ही अत्यंत महागडी आणि तांत्रिकदृष्ट्या कठीण प्रक्रिया होती, त्यामुळे सुरुवातीला केवळ महत्त्वाच्या वास्तूंचेच चित्रण केले जात असे. 1839 मध्ये जगभरात 'डागुएरोटाईप' (Daguerreotype) पद्धतीचा शोध लागल्यानंतर अवघ्या काही वर्षांतच हे तंत्र गोव्यासारख्या आंतरराष्ट्रीय बंदर असलेल्या राज्यात पोहोचले असावे, असा कयास बांधला जातो.

वास्तूंच्या पलीकडे जाऊन गोव्यातील पहिले 'पोर्ट्रेट' कधी काढले गेले असेल, याबद्दल अद्याप ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. 1850 च्या दशकात किंवा अगदी 1840 च्या उत्तरार्धात काढलेली काही छायाचित्रे पोर्तुगालमधील अर्काईव्हजमध्ये किंवा एखाद्या खाजगी संग्रहात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोव्यातील रस्ते, बाजारपेठा किंवा सामान्य माणसांचे तत्कालीन जीवन टिपणारी छायाचित्रे शोधणे हे आजही एक मोठे आव्हान आहे. जर 1840 च्या दशकातील एखादे छायाचित्र सापडले, तर ते केवळ गोव्याच्याच नव्हे, तर भारतीय उपखंडातील छायाचित्रणाच्या इतिहासातील एक मोलाचा ठेवा ठरेल.

जुने गोवेतील (Old Goa) चर्चचे चित्रण करणाऱ्या काही सुरुवातीच्या छायाचित्रकारांमध्ये युरोपियन प्रवाशांचा मोठा वाटा होता. त्या काळी कॅमेरे आजच्यासारखे छोटे नव्हते, तर ते लाकडी पेट्यांसारखे मोठे असायचे आणि एक फोटो काढण्यासाठी बराच वेळ लागत असे. गोव्याच्या आर्द्र हवामानात ही छायाचित्रे आणि त्यांच्या काचेच्या प्लेट्स जतन करणे ही देखील एक मोठी समस्या होती. तरीही, 1860 पूर्वीची काही दुर्मिळ चित्रे आजही इतिहासाच्या प्रवासाची साक्ष देतात. जर कोणाकडे अशा प्रकारचे जुने फोटो किंवा त्याबद्दलची माहिती असल्यास, ती गोव्याच्या सांस्कृतिक इतिहासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Midterm Elections Result: महागाई, भ्रष्टाचार अन् इराण युद्ध पडले महागात! ट्रम्पला अमेरिकन जनतेचा मोठा दणका; डेमोक्रॅट्सचा दणदणीत विजय

Modi Cabinet Decision: दिवाळीपूर्वी मोदी सरकारची खूशखबर! अग्निवीरांना मिळणार 2 वर्षांचा सेवा विस्तार; लाखो जवानांना मोठा दिलासा

VIDEO: "हे सेलिब्रेशन माझ्या गर्लफ्रेंडसाठी होतं!", अर्शदीपच्या खास 'डान्स स्टेप'चा व्हिडिओ तुफान व्हायरल; चाहत्यांचं जिंकलं मन

कर्तव्यात कसूर अन् युद्धनौका धोक्यात आणल्याचा ठपका! INS ब्रह्मपुत्र दुर्घटनेप्रकरणी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कोर्ट मार्शल; भारतीय नौदलाची मोठी कारवाई

Toll Tax New Rules: टोल प्लाझावर थांबण्याची गरजच नाही! NHAI चा नवा नियम लागू, हायवेवर आता मिळणार 'ट्रॅफिक जाम'पासून मुक्ती

SCROLL FOR NEXT