Anil Samant, Goa Marathi Academy Dainik Gomantak
गोवा

Goa: इन्क्विझिशन असतानाही, गोव्यात मराठीमुळेच 'हिंदुत्व' टिकले! प्रा.अनिल सामंत यांचे प्रतिपादन

Anil Samant: राज्यात इन्क्विझिशन लादूनही हिंदुत्व अबाधित राहिले ते मराठी भाषेमुळेच, असे प्रतिपादन गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांनी केले.

Sameer Panditrao

पणजी: राज्यात इन्क्विझिशन लादूनही हिंदुत्व अबाधित राहिले ते मराठी भाषेमुळेच, असे प्रतिपादन गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांनी केले.

इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा येथे ‘सृजनाकडून सर्जनशीलतेचा प्रवास’ या प्रा. डॉ. स्नेहा सुवास प्रभू महांबरे लिखित शोधलेख संग्रहाचा लोकार्पण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सामंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ‘आयएमबी’चे सदस्य सचिव अशोक परब, पत्रकार परेश प्रभू, डॉ. स्नेहा प्रभू महांबरे उपस्थित होते.

दरम्यान, सामंत म्हणाले, गोव्यावर अनेक राजवटींनी राज्य केले त्या प्रत्येक राज्यकर्त्यांची भाषा कधी फारसी, उर्दू, कन्नड आणि पोर्तुगीज होती. या राजवटींचा कालखंडही मोठा आहे; परंतु इतके असूनही गोव्यात मराठी टिकली कारण ती लोकभाषा होती. पांडुरंग पिसुर्लेकर, अ. का. प्रियोळकरांनंतर मराठी संशोधनाची स्थिती काय आहे? असा प्रश्‍न केला जायचा;

परंतु मागील दहा वर्षांत अनेक संशोधनात्मक उत्तम ग्रंथ प्रसिद्ध झाले असून गोव्याच्या मराठी संशोधन क्षेत्रात डॉ. स्नेहा प्रभू महांबरे यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांचे शोधनिबंध हे क्लिष्ट नसून लालित्यपूर्ण आहेत. हे त्यांच्या संशोधात्मक लेखांचे वैशिष्ट्य आहे. यावेळी डॉ. महांबरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर सूत्रसंचालन चित्रा क्षीरसागर यांनी केले.

ग्रंथ संशोधकांना दिशा देणारा!

‘सृजनाकडून सर्जनशीलतेचा प्रवास’ या शोधनिबंध संग्रहातून गोमंतकीय भाषा, संस्कृती आणि समाजाचे नवदर्शन घडते. गोव्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन यातून व्यक्त होतो. नवे संदर्भ, विचारसूत्र या शोधनिबंधांतून येतात. याचा विचार नवसंशोधकांनी करावा. संशोधकांना दिशा देणारा हा ग्रंथ निश्‍चितपणे फायद्याचा ठरेल, असे मत पत्रकार परेश प्रभू यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT