Nitin Phaldesai Dainik Gomantak
गोवा

हिंदूंनी मनाबरोबरच आपली मनगटेही बळकट करावीत: बजरंग दल

खंडेनवमी निमित्ताने सर्व तालूका स्तरावर शस्त्र पुजन कार्यक्रम करण्यात आले.

दैनिक गोमन्तक

ज्या प्रकारे राजकीय लोक आपली रणनिती आखत आहेत. स्वार्थासाठी युती क‌रत आहेत. जनतेच्या सु:खद:खाची चाड न ठेवता लायकी नसलेल्या लोकांकडे आपली संधांन साधत आहेत. यामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू जनतेवर फार मोठे संकट येऊन आमचे अस्तीव्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हिंदूनी आता मनाबरोबरच मनगटानेही मजबूत होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय बजरंग दलाचे (Goa) अध्यक्ष नितीन फळदेसाई (Nitin Phaldesai) यांनी केले. खंडेनवमीच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने खड्ग पुजा अर्थात शस्त्रपूजा करण्यात आली. या निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात फळदेसाई बोलत होते. खंडेनवमी निमित्ताने सर्व तालूका स्तरावर शस्त्र पुजन कार्यक्रम करण्यात आले.

हिंदू धर्मातील शौर्याचा इतिहास आणि परंपरा आहे. पण विद्यमान परिस्थितीत एक मरगळ आली आहे. नेमके हेच हेरून काही धर्मांध लोकांनी गोव्यात विविध प्रयोग चालवले आहेत. या प्रयोगाचे खरे रंग आपल्याला येत्या निवडणुकीत दिसू शकतात. बंगाल येथून दहा हजार कार्यकर्ते गोव्यात येणार आहेत. हे निवडणुकीच्या निमित्ताने गोव्यात घुसून नंतर इथेच स्थाईक झाल्यास नवल वाटायला नको. कारण येथील राजकारण स्वार्थाने आंधळे झाले आहे. रथी- महारथी जाऊन लायकी नसलेल्या लोकांचे तळवे चाटत आहेत. त्यामुळे उद्या काहीही होऊ शकते. प्रत्येक हिंदू ने सावधान असणे गरजेचे आहे, असेही फळदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींगच्या निधीसाठी पंचायत आक्रमक

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

Crime News: देवगड- फणसे समुद्रकिनाऱ्यावर आढळला शीर नसलेला मृतदेह, घात की अपघात?

काश्मीरनंतर 'द बंगाल फाइल्स'वरुन वाद; ट्रेलर लाँचवेळी कोलकातामध्ये गोंधळ, अग्निहोत्री म्हणाले, 'हुकूमशाही चालणार नाही'

SCROLL FOR NEXT