Hindu Sanghatana At Mapusa Police Station  Dainik Gomantak
गोवा

Mapusa News: विनाकारण सलोखा बिघडवणाऱ्यांवर कारवाई करा! हिंदू संघटनांचे पोलिसांना निवेदन

Mapusa Police Station: सायंकाळी शेकडोच्या संख्येने हिंदूंनी हुतात्मा चौक ते पोलिस स्थानक पर्यंत शांततेत मोर्चा काढला. या मोर्चेकरांना पोलिस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी रोखले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Canacona Julus Dispute Hindu Sanghatana At Mapusa Police Station

म्हापसा: विनाकारण काणकोण जुलूस संबंधीचे निवेदन म्हापसा पोलिसांत देऊन म्हापशात सलोखा बिघडवून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन हिंदू संघटनेच्या बॅनरखाली समस्त हिंदूत्वप्रेमींनी पोलिस निरीक्षक निखिल पालेकर यांना दिले.

एकप्रकारे हिंदू समाज बांधवांनी पोलिस स्थानकाबाहेर गर्दी करून शक्तिप्रदर्शन केले. सोमवारी सायंकाळी शेकडोच्या संख्येने हिंदूंनी हुतात्मा चौक ते पोलिस स्थानक पर्यंत शांततेत मोर्चा काढला. या मोर्चेकरांना पोलिस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी रोखले.

तर दहा जणांच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक यांची भेट घेत, त्यांना निवेदन सादर केले. दोन दिवसांपूर्वी काही मुस्लिम बांधवांनी काणकोण जुलूस विषयी पोलिसांना निवेदन दिले होते. काहींनी आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असे त्यांनी म्हटले होते.

जयेश थळी म्हणाले की, काणकोण (Canacona) येथे जुलूस काढण्यास शासनाने तिसऱ्यांदा परवागनी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्‍नाला अनुसरून शासनाने हा निर्णय घेतला आहे. खरेतर हा काणकोण येथील स्थानिक पातळीवरील जुलूस संबंधी वाद असताना तसेच म्हापसा शहरात या विषयी काही वादविवाद नसताना अनावश्यक म्हापसा पोलिस स्थानकात काणकोण जुलूस संबंधी निवेदन सादर करून मुद्दामहून म्हापसा परिसरातील धार्मिक सलोखा बिघडवून कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करणाऱ्यावर त्वरित चौकशी करून कारवाई करावी, अशी आमची हिंदूची मागणी आहे

काणकोणात 'हिंदवी स्वराज्य संघटनेने जुलूसला विरोध दर्शवला आहे. ते योग्य आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी सुजन नाईक, सिद्धार्थ मांद्रेकर, संजय वालावलकर, आशिष शिरोडकर, श्रद्धा तिवरेकर, अमेय नाटेकर, विकास महाले, संजय मडगावकर ,आदी प्रतिष्ठित नागरिकांचा यात सहभाग होता.

जय श्रीराम, जय शिवरायच्या घोषणा

यावेळी मोर्चेकऱ्यांनी गळ्यात भगवा शेला तसेच हातात भगवे झेंडे घेतले होते. हिंदू प्रेमींनी जय श्रीराम, शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय तसेच हुतात्मा चौकात हनुमान चालीसा पठन केले. कुणीही हिंदूंना गृहीत धरू नये असा इशारा संबंधितांनी यावेळी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT