Hindu Rashtra Coordination Committee Dainik Gomantak
गोवा

Goa News: 'बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावा, गोव्यात CAA लागू करा'; हिंदू राष्ट्र समन्वय समिती

Hindu Rashtra Coordination Committee : एकीकडे बांगलादेशातील हिंदूंचा वंशविच्छेद चालू आहे आणि दुसरीकडे भारत बांगलादेशी घुसखोरांचे नंदनवन बनला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : गेले काही महिने बांगलादेशातील हिंदूंची मंदिरे, घरे, दुकाने नष्ट केली जात आहेत आणि हिंदूंच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यांखाली कारागृहात टाकण्यात येत आहे. एकीकडे बांगलादेशातील हिंदूंचा वंशविच्छेद चालू आहे आणि दुसरीकडे भारत बांगलादेशी घुसखोरांचे नंदनवन बनला आहे.

परिणामी बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात भारतात सर्वत्र तीव्र संतापाची लाट उसळली आहे. गोव्यात बांगलादेशी घुसखोर येऊन स्थायिक होऊ लागल्याची अनेक उदाहरणे समोर आलेली आहेत.

या पार्श्वभूमीवर गोव्यात 'राष्ट्रीय नागरिकता नोंदणीला' लागू करून बांगलादेशी घुसखोरांना गोव्यातूनच नव्हे, तर देशातून बाहेर हाकलून लावावे, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने ४ जानेवारी या दिवशी पणजी येथील आझाद मैदानात आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे करण्यात आली.

आंदोलनामध्ये हिंदु रक्षा महाआघाडी, विश्व हिंदू परिषद, इस्कॉन, बजरंग दल, भारत माता की जय, गोमंतक मंदिर महासंघ, अस्नोडा येथील शिवप्रेमी, हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी, सनातन संस्था आदी संघटनांचा सहभाग होता.

आंदोलनाच्या प्रारंभी युवराज गावकर यांनी आंदोलनाचा उद्देश स्पष्ट केला. यानंतर वक्त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. वक्त्यांच्या संबोधनातून सरकारकडे पुढील मागण्या मांडण्यात आल्या. गोव्यात निरनिराळ्या व्यवसायात गुंतलेल्या बांगलादेशी घुसखोरांना कोणाचा पाठिंबा आहे, हे शोधून काढून संबंधितांवर कारवाई करावी.

घुसखोरांची सूची, छायाचित्रे संबंधित भागांमध्ये प्रसारित करावीत, नोकरी देतांना संबंधितांची पार्श्वभूमी नीट तपासावी, तसेच अशा शंका असलेल्यांना कुठेही नोकरी, भाड्याने अथवा विकत घर मिळू नये, अशी व्यवस्था करावी, तसेच घुसखोरांना आश्रय देणार्‍यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी.

भारताच्या सीमा अवैधपणे ओलांडून भारतात येण्यास कुणी धजावणार नाही, अशी या घुसखोरांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. वेश्याव्यवसायात बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती मिळूनही पोलिसांनी त्यांच्या विरोधात कारवाई केल्याचे दिसत नाही. अशा कर्तव्यचुकार पोलिसांवरही कारवाई करावी.

आंदोलनाच्या अखेर सत्यविजय नाईक यांनी वरील मागण्यांविषयी मांडलेल्या ठरावांना सर्वांनी अनुमती दिली. या मागण्या राज्य आणि केंद्र सरकारला पाठवण्यात येणार आहेत. आंदोलनाला ‘हिंदू रक्षा महाआघाडीचे’चे नितीन फळदेसाई, विश्व हिंदु परिषदेचे संजीव कोरगावकर आणि गोमंतक मंदिर महासंघाचे जयेश थळी आदींनी संबोधित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT