Goa Assembly Winter Session:'... तर आझाद मैदानावर जनतेचे अधिवेशन घेऊ'; दोन दिवसीय अधिवेशनावर विजय सरदेसाई भडकले

Goa Assembly Session: कुठलीही आणीबाणीची परिस्थिती उद्‍भवलेली नसताना या सरकारने फक्त दोन दिवसांचेच अधिवेशन का बोलावले, याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे.
Goa Assembly Winter Session:'... तर आझाद मैदानावर जनतेचे अधिवेशन घेऊ'; दोन दिवसीय अधिवेशनावर विजय सरदेसाई भडकले
Vijai SardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Assembly Winter Session 2025

मडगाव: कुठलीही आणीबाणीची परिस्थिती उद्‍भवलेली नसताना या सरकारने फक्त दोन दिवसांचेच अधिवेशन का बोलावले, याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे, अन्यथा आम्हा विरोधकांवर पणजीच्या आझाद मैदानावर लोकांचे अधिवेशन घेण्याची पाळी येईल, असा इशारा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी दिला आहे.

शुक्रवारी (3 जानेवारी) एक व्हिडिओ प्रसारित करून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण मागितले आहे. यापूर्वी पर्रीकर आजारी असताना आणि नंतर कोविडची साथ असताना असे छोटे अधिवेशन घेतले आहे. पण आता तशी कोणतीही परिस्थिती नसताना हे असे दोन दिवसांचे विधानसभा अधिवेशन काय? असा सवाल करून प्रमोद सावंत यांना चीनमधून एखादा नवीन व्हायरस येणारं याची माहिती मिळाली, की त्यांना बदलून गोव्यात (Goa) नवीन मुख्यमंत्री आणला जाणार, ज्याची तयारी झालेली नसल्याने हे अधिवेशन दोन दिवसांवर आणले आहे का? असा सवाल त्यांनी केला.

Goa Assembly Winter Session:'... तर आझाद मैदानावर जनतेचे अधिवेशन घेऊ'; दोन दिवसीय अधिवेशनावर विजय सरदेसाई भडकले
Goa Politics: '...त्यामुळेच भाजपने विधिमंडळ अधिवेशन दोन दिवसांचं ठेवल'; विरोधी पक्षनेत्याचा मोठा आरोप!

हा निर्णय आपला नव्हे, तर मंत्रिमंडळाचा असा खुलासा सभापती रमेश तवडकर (Ramesh Tawadkar) यांनी केला आहे. याचा उल्लेख करत, या सरकारच्या पातळीवर दररोज नवीन घोटाळा उघडकीस येतो. त्यात कॅश फॉर जॉब घोटाळा आणि जमीन हडप घोटाळा, अशा अनेक प्रकरणाचा सामावेश आहे. या अशा प्रकरणांवर चर्चा होऊ नये, असे वाटल्यानेच विधानसभा अधिवेशन दोन दिवसांवर आणले का? असा सवाल त्यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com