T Rajasingh X
गोवा

Vishva Hindu Parishad: 'गोव्यात हिंदूंची संख्या घटतेय, विचार न केल्यास भविष्यकाळ धोकादायक'; राजासिंग यांचा इशारा

Curchorem Shourya Yatra: बजरंग दल हिंदू धर्मीयांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी कार्यरत आहे. देशात मुस्लिम लोकसंख्या वाढविण्याचे कट कारस्थान रचले जात आहे. पण हिंदूची संख्या घटत आहे. लोकसंख्या घटत आहे, तिथे धर्मांतरण केले जात आहे असा इशारा टायगर राजासिंग यांनी दिला.

गोमन्तक डिजिटल टीम

T Raja Singh About Hindu Population In Goa

कुडचडे: बजरंग दल हिंदू धर्मीयांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी कार्यरत आहे. देशात मुस्लिम लोकसंख्या वाढविण्याचे कट कारस्थान रचले जात आहे. पण हिंदूची संख्या घटत आहे. लोकसंख्या घटत आहे, तिथे धर्मांतरण केले जात आहे. गोव्यातही तीन टक्के असलेली मुस्लिम लोकसंख्या बारा टक्क्यांवर पोहचली आहे. आज सावध होऊन विचार न केल्यास भविष्यकाळ हिंदूंसाठी धोकादायक आहे, असा इशारा टायगर राजासिंग यांनी दिला.

कुडचडे येथे विश्‍व हिंदू परिषदेच्या बरजंग दल, गोवा विभागातर्फे गीता जयंतीनिमित्त आयोजित ‘शौर्य यात्रा’ कार्यक्रमात प्रमुख वक्ते या नात्याने राजासिंग बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विश्व हिंदू परिषद, गोवा प्रमुख मोहन आमशेकर, बजरंग दलाचे पालक संकेत आर्सेकर, राजेंद्र पवार, विराज देसाई व इतर उपस्थित होते.

राजासिंग पुढे म्हणाले, गोव्यात जगभरातील लोक येऊन आदर्श शिकतात. आम्ही इतिहास विसरणारे नाही, म्हणूनच गोव्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यात हिंदू म्हणून जगण्याची संधी दिली. आज बजरंग दल आहे म्हणून हिंदू सुरक्षित आहे.राष्ट्रधर्म जाणण्यासाठी संघ शाखा हाच पर्याय आहे. नसल्यास पुढील काळात हिंदू संस्कृती बरोबर हिंदू उत्सव बंद पडणार असल्याची भीती व्यक्त केली. यावेळी त्यांनी संख्या वाढ करणाऱ्यांवर सडकून टीका केली. राजासिंग यांनी हमास, पाकिस्तान, बांगलादेशला सहकार्य करणाऱ्या ओवेसीवर सडकून टीका केली.

आत्मरक्षण महत्वाचे

विश्व् हिंदू परिषदेचे प्रमुख मोहन आमशेकर यांनी उपस्थित असलेल्यांना महत्वपूर्ण अश्या हिंदू संघटित होण्यासाठी घोषणा म्हणून घेतल्या नंतर प्रत्येक हिंदूंने आपल्या प्रभागात बजरंग दलाची शाखा सुरु करणे आवश्यक असून हिंदूंनी आता आत्म संरक्षणासाठी शस्त्र बाळगणे आवश्यक आहे. कुणावर हल्ला करण्यासाठी नसून धर्म रक्षणासाठी शस्त्र बाळगलेच पाहिजे. या वेळी बांगलादेश मध्ये हिंदूंवर होणारे अमानुष छळ यावर भाष्य करून धार्मिक संस्थांनी बजरंग दलाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

शौर्यसभेतील क्षणचित्रे

बजरंग दलाकडून सभास्थळी आकर्षक सजावट

ढोल ताशा पथकाकडून उत्स्फूर्त गीता गर्जना.

शौर्य संचालनात अडीज हजारहून अधिक युवक.

टायगर राजा सिंग यांचे सभास्थळी जोरदार स्वागत.

सभेला पाच हजारहून अधिक उपस्थिती.

अपेक्षेहून अधिक उपस्थिती लाभल्याने व्यवस्था कोलमडली.

सभेत ‘जय श्रीराम’चा उद्‍घोष.

हिंदी भाषिकांची उपस्थिती लक्षणीय.

हिंदू संस्कृती टिकवून ठेवण्या साठी स्पर्धा विसरून सगळे एकत्र येणे महत्वाचे आहे. गेली तीन वर्षे बजरंग दल संघटना बांधणी करीत होते. म्हणून आज कुडचडेत एकता दिसून आली. हिंदू संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी घराघरांत बजरंगी तयार व्हायला हवा.
-संकेत आर्सेकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

SCROLL FOR NEXT