Bicholim Police Station | Muslim Federation Dainik Gomantak
गोवा

सरकारने मध्यस्थी करावी! 'जुलूस'वरून काणकोणातील वाद सोडवण्यासाठी मुस्लिम महासंघाचे पोलिसांना निवेदन

Canacona Dispute News: 'जुलूस' काढण्यावरून काणकोणमध्ये सध्या गुंता निर्माण झाला आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधामुळे प्रशासकीय यंत्रणेने ''जुलूस''ला तिसऱ्यांदा परवानगी नाकारली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Canacona News

डिचोली: ''जुलूस'' वरून काणकोणमध्ये निर्माण झालेला गुंता सरकारने सामोपचाराने मिटवावा, अशी मागणी मुस्लिम महासंघाने केली आहे. तशी मागणी करणारे निवेदन मुस्लिम महासंघातर्फे रविवारी डिचोली पोलिसांना देण्यात आले आहे.

या प्रश्नावरून कोणीही कायद्या विरोधात जाऊ नये, अशी मागणीही महासंघाने केली आहे. ''जुलूस'' काढण्यावरून काणकोणमध्ये सध्या गुंता निर्माण झाला आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधामुळे प्रशासकीय यंत्रणेने ''जुलूस''ला तिसऱ्यांदा परवानगी नाकारली आहे.

त्यातच काहीजण समाज माध्यमावरून भावना दुखावणारे वादग्रस्त पोस्ट करीत आहेत, असा दावा करून या प्रकाराबद्दल मुस्लिम बांधवांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुस्लिम महासंघाच्या बॅनरखाली डिचोलीतील मुस्लिम बांधवांनी शांत मार्गाने डिचोली पोलिस स्थानकावर धडक दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT