Ponda News  Dainik Gomantak
गोवा

Hindu Convention at Ponda : देशातील एक हजार मंदिरात वस्त्रसंहिता ते हिंदू राष्ट्राची घोषणा; गोव्यातील हिंदू अधिवेशनातील 7 ठराव

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा : हिंदू हिताच्या उपक्रमांना गती देण्याबरोबरच लव्ह जिहादसारखे प्रकार घडू नयेत तसेच हिंदू ऐक्य साधून हिंदू राष्ट्राची पूर्तता आणि देशपातळीवर हिंदू संघटनांच्या एकत्रिकरणासाठी जिल्हा, राज्य आणि देशभर हिंदू राष्ट्र समन्वय समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. त्यासंबंधीचा ठराव रामनाथी-फोंड्यातील हिंदू अधिवेशनात घेण्यात आला. अन्य महत्त्वाचे ठरावही यावेळी झाले.

गेले सात दिवस रामनाथी येथे चाललेल्या हिंदू अधिवेशनात विविध हिंदू संघटनांच्या मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. अनेक विषयांवर चर्चा, परिसंवाद झाले, त्यातून हिंदू ऐक्य आणि हिंदूंच्या हितासाठी अनेक निर्णय घेण्यात आले. हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्रित येण्याची आवश्‍यकता असल्याचा सूरही यावेळी अधिवेशनात व्यक्त करण्यात आला. (7 day Hindu convention at Ponda)

फोंड्यातील विश्‍व हिंदू परिषद सभागृहात गुरुवारी हिंदू अधिवेशनाच्या सांगता समारंभाची माहिती देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला हिंदू जनजागृती समितेचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे, शांती काली आश्रमाचे चित्तरंजन स्वामी, गोमंतक मंदिर महासंघाचे जयेश थळी, राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे तसेच विवेकानंद कार्य समितीचे अध्यक्ष नीरज अत्री आदी उपस्थित होते. तसेच देशभरातील हिंदू संघटना, नेपाळ व इतर देशांतील संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अधिवेशनातील महत्त्वाचे ठराव

१. हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करणे

२.एक हजार मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणे

३. लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोवंश हत्येविरुद्ध कठोर कायदा करणे

४. हलाल सर्टिफिकेशनवर बंदी आणणे

५. मंदिरांचे सरकारीकरण रद्द करणे

६. जनसंख्या नियंत्रण

७.काश्‍मिरी हिंदूंचे पूनर्वसन करणे

‘गोवा फाईल्स’संबंधी चाचपणी

‘केरळ स्टोरी’नंतर आता ‘गोवा फाईल्स’मधून पोर्तुगीजांच्या अत्याचाराची माहिती देण्यासाठी ‘गोवा फाईल्स’ची निर्मिती करण्यासाठीची प्राथमिक चाचपणी सुरू झाली आहे. गोमंतकाचा इतिहास हा ओढून ताणून नव्हे, तर जे काही खरे घडले ते दाखवण्याचा प्रयत्न होणार असून त्यासाठी सत्याची चाचपणी आधी होणार आहे, त्यादृष्टीनेच कार्यवाही सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT