Drowning Dainik Gomantak
गोवा

Candolim: मद्यधुंद अवस्थेत समुद्रात गेला, माघारी येताच जीवाला मुकला; चंदीगडच्या पर्यटकाचा कांदोळीत मृत्यू

Candolim Drowning Case: दृष्टीच्या जीवरक्षकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्याला आवश्यक प्रथमोपचार दिले.

Pramod Yadav

कांदोळी: मद्यधुंद अवस्थेत समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. मृत पर्यटक मूळ चंदीगडचा रहिवासी असल्याची माहिती आहे. दृष्टीच्या जीवरक्षकांनी पर्यटकाला रुग्णालयात दाखल केले पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शनिवारी (दि. १९ ऑक्टोबर) कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर ही घटना घडली.

दृष्टी जीवरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय पर्यटक तीन मित्रांसोबत कांदोळी येथील समुद्रात पोहण्यासाठी गेला. सर्वजण समुद्रातून सुखरुप माघारी आले मात्र, एकजण माघारी येताच खाली कोसळला.

दृष्टीच्या जीवरक्षकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्याला आवश्यक प्रथमोपचार दिले. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत पर्यटक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती दृष्टीच्या जीवरक्षकांनी दिली आहे.

भिंतीवरून पडून एकाचा मृत्यू

दाबोळी येथे भिंतीवरुन पडून सुजल मरांडी (४५) या मूळ झारखंड येथील इसमाचा मृत्यू झाला. सध्या तो दाबोळी येथे राहत होता. त्याच्या निवासस्थानाजवळील भिंतीवर चढून काम करत असताना तोल जाऊन तो खाली पडला.

त्यास प्रथम चिखली येथे उपजिल्हा इस्पितळात व नंतर गोमेकॉत नेण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kala Academy: कला अकादमी नूतनीकरणाचे काम कृती दलाकडून 'नापास', काय नोंदवले मत वाचा

Snake In Train: झारखंड - गोवा ट्रेनच्या एसी कोचमध्ये आढळला साप, प्रवाशांची पळता भुई थोडी Video

Goa Live Updates: पणजीतील केएफसीला प्रदूषण मंडळाची नोटीस, परवाना मिळेपर्यंत काम बंद ठेवण्याचा आदेश

Online Cricket Betting: पर्वरीत क्रिकेट सट्टाबाजीचा पर्दाफाश; ५ जणांना अटक, सुमारे लाखभर रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

Diwali 2024: फोव कांडप गेलें मात गोंयान 'परंपरा' जपली!

SCROLL FOR NEXT