JMFC Notice Dainik Gomantak
गोवा

JMFC Notice: 'जेएमएफसी'च्या आदेशाला उच्च न्यायालयाचा दणका; वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना मोठा दिलासा

Goa High Court JMFC Stay: राज्य सरकारसह गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता, पोलिस अधीक्षक जीवबा दळवी आणि पोलिस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: काशिनाथ शेटये यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून मेरशी येथील ‘जेएमएफसी’ न्यायालयाने दिलेल्या आदेशाला आणि बजावलेल्या नोटिशीला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे. यासोबतच खंडपीठाने तक्रारदार काशिनाथ शेटये यांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्य सरकारसह गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता, पोलिस अधीक्षक जीवबा दळवी आणि पोलिस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ‘जेएमएफसी’ न्यायालयाने बजावलेली नोटीस आणि सुरू केलेली कारवाई कायदेशीर प्रक्रियेला धरून नसल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला होता.

काशिनाथ शेटये यांनी कनिष्ठ अधिकाऱ्यांना पाठीशी घातल्याचा आणि कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप करत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत मेरशी येथील ‘जेएमएफसी’ न्यायालयाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.

तथापि, उच्च न्यायालयाने या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेची गंभीर दखल घेत कनिष्ठ न्यायालयातील पुढील सर्व प्रक्रियेला तत्काळ स्थगिती दिली. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आता या प्रकरणाची पुढील सुनावणी उच्च न्यायालयात होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Land Compensation: जमीन मोबदल्यासाठी 7 वर्षांची प्रतीक्षा! 15 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या; गोवा खंडपीठाचे निर्देश

World Peace University: तंत्रज्ञानाने जग जवळ आले, पण मने दूरच! विश्वशांतीसाठी राज्यपालांचे महत्त्वाचे आवाहन; 'डब्ल्यूपीयू'च्या परिषदेचे थिवीत उद्‌घाटन

खरी कुजबुज: मंत्र्यांचा पाठिंबा नेमका कोणाला?

Bungalow Sale Fraud: बंगला विक्रीचे आमिष दाखवून निवृत्त कर्मचाऱ्याला गंडा; 99.50 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

America School Shooting: अमेरिकेतील प्राथमिक शाळेत अंधाधुंद फायरिंग! 3 चिमुकल्यांसह 5 जणांचा मृत्यू, 16 वर्षांचा हल्लेखोरही ठार; परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT