Goa Traffic Dainik Gomantak
गोवा

Panaji Smart City: पणजीतील वाहतूक कोंडीबाबत प्रतिज्ञापत्र द्या; गोवा खंडपीठाचे निर्देश

पुढील सुनावणी 14 जुलैला

दैनिक गोमन्तक डिजिटल

Panaji Smart City: राजधानी पणजीतील होणारी वाहतुकीची कोंडी तसेच वाहतूक व्यवस्थापनातील गलथानपणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने घेतलेल्या स्वेच्छा याचिकेत वाहतूक सचिवांना नोडल अधिकारी नेमून वाहतुकीच्या कोंडीमागील स्पष्टीकरण प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यावरील सुनावणी पुढील महिन्यात 14 जुलै 2023 रोजी ठेवली आहे.

पणजीतील दिवजा सर्कलजवळ उभारण्यात येत असलेल्या सांता मोनिका जेटीजवळ तसेच मांडवी किनारी भागातील रस्त्यांवर वाहने पार्किंग केली जात असल्याने अनेकदा वाहतूक कोंडी होत आहे. यासंदर्भात गोवा खंडपीठाने दोन महिन्यापूर्वी गंभीर दखल घेतली होती.

वारंवार होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे अनेक समस्या उद्‍भवत असताना वाहतूक व्यवस्थापनाबाबत कोणतीच पावले उचलण्यात आली नव्हती.

गोवा खंडपीठाने यासंदर्भात वाहतूक, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम खाते, पणजी महापालिका तसेच स्मार्ट सिटी कंपनीला प्रतिवादी करून नोटिसा बजावल्या होत्या.

आज वाहतूक खात्यातर्फे राज्यातील वाहतूक व्यवस्थापनाबाबत तयार रण्यात येत असलेला आराखडा सादर करण्यात आला.

मात्र याबाबत पर्यायी कायमचा तोडगा काढण्यासाठी ठोस उपाययोजनांबाबतचे नियोजन तयार करण्यासाठी गोवा खंडपीठाने वाहतूक सचिवांना त्याची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

पणजीमध्ये प्रतिदिन मोठ्या प्रमाणात वाहने प्रवेश करतात व त्यातच पार्किंगची समस्या असल्याने अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूने वाहने उभी केल्याने वाहतुकीची कोंडी होते. नव्या पाटो पुलाजवळ असलेल्या सांता मोनिका जेटी सुरू झाल्यावर ही समस्या वाढणार आहे. पर्यटकांना या जेटीवर घेऊन येणाऱ्या टॅक्सी तसेच खासगी वाहनांची संख्या वाढल्यास तेथे पार्किंगची काहीच व्यवस्था नाही.

मांडवी तिरावर बेशिस्त पार्किंग

पणजी फेरीबोट धक्का ते मांडवीच्या तिरावर असलेल्या कसिनो कार्यालयामुळे तेथील ‘नो पार्किंग’ भागात वाहने उभी केली जात आहेत. त्याचा परिणाम शहरातील सुरळीत वाहतुकीवर होतो.

सांता मोनिका येथे मल्टीलेव्हल पार्किंग इमारत असूनही त्याचा वापर पूर्णपणे होत नाही. भविष्यात ही समस्या दिवसेंदिवस अधिक जटील होण्याची शक्यता असल्याने त्यावर वेळीच पर्याय काढण्याची गरज असताना सरकारकडून दुर्लक्ष झाल्याने खंडपीठाने त्यात हस्तक्षेप करत दखल घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan Comeback: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT