केंद्रीय मंत्र्याचे तांत्रिक सल्लागार येणार गोव्यात; वेस्टर्न बायपासची पाहणी करणार : सरदेसाई

वेस्टर्न बायपास रस्त्याचा भाग स्टिल्टवर करण्याची मागणी सरदेसाईंनी केंद्रीय मंत्री गडकरींकडे केली होती.
Goa Forward Party | Vijai Sardesai
Goa Forward Party | Vijai SardesaiDainik gomantak
Published on
Updated on

Vijay Sardesai : वेस्टर्न बायपास रस्त्याचा बाणावली येथील भाग स्टिल्टवर करण्याच्या मागणीची स्वतः पाहणी करून शहानिशा करण्यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचे तांत्रिक सल्लागार आर. के. पांडे हे स्वतः गोव्यात येणार असल्याची माहिती गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आज गोयकार घर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

"आपण केंद्रीय रस्ता वाहतुक व राष्ट्रीय मार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना पश्र्चिम बगल रस्ता स्टील्टवरच व्हावा याबद्दल आग्रह धरला. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या मध्यात तांत्रिक सल्लागार पांडे पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे ठरले आहे. या कालावधीत जोराचा पाऊस पडतो व खरी परिस्थिती जाणून घेता येते."

तांत्रिक सल्लागारांच्या पाहणी नंतरच पश्र्चिम बगल रस्त्यासंदर्भात निर्णय शक्य असल्याचे सरदेसाई यांनी आज सांगितले. सरदेसाई यांनी काही दिवसांपूर्वीच नवी दिल्ली येथे गडकरी यांची भेट घेऊन ही मागणी केली होती.

Goa Forward Party | Vijai Sardesai
konkan Railwayच्या पावसाळी वेळापत्रकात बदल; जाणून घ्या प्रवास करण्यापूर्वी सर्व गाड्यांची माहिती

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली असुन केवळ तांत्रिक सल्लागारांच्या पाहणी नंतर निर्णय घेऊ असे स्पष्ट केल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.

2022 रोजी जलस्त्रोत खात्याचे अभियंते साईनाथ जामखंडी यानी गतसाली पावसाळ्यात या भागात पूर आल्यावर अहवाल तयार केला होता व हायड्रोलोजिस्ट तर्फे अभ्यासाची शिफारस केली होती. मात्र राज्य सरकारने किंवा संबंधीत खात्याने या अहवालाची दखल घेतलेली नाही.  

19 जून रोजी उच्च न्यायालयातही पश्र्चिम बगल रस्त्या संदर्भात सुनावणी आहे, तेव्हा हा अहवालही न्यायालयाच्या लक्षात आणुन द्यायला पाहिजे असे मतही सरदेसाई यानी व्यक्त केले.

Goa Forward Party | Vijai Sardesai
Hina Khan in Goa: गोव्याबाबत काय म्हणाली अभिनेत्री हिना खान; जाणून घ्या...

या अहवालाच्या आधारेच स्टील्टवरील पश्रिच बगल रस्त्याच्या मागणीला मजबुती येईल. केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी नंतर आपण मुख्यमंत्र्यांशी सुद्धा बोललो व या भेटीत नेमके काय चर्चा झाली व पुढील उपाययोजना कशी असावी हे त्यांना सविस्तरपणे सांगितले आहे.

स्टील्टवरील पश्र्चिम बगल रस्त्यासाठी आपणासह मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, सरपंच, पंच सर्वांनीच आपल्यापरीने प्रयत्न केले आहेत. पण आता सर्व संबंधीतांनी एकत्र येऊनच संघटीतपणे ही मागणी पुढे न्यावी लागेल असेही सरदेसाई यानी सुचविले.  

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com